काय चाललंय ? या कोरोनाला तर तुम्ही बाजार बनविला :- पारोमिता गोस्वामी

0
120

चंद्रपूर : कोरोनाच्या भीषण संकटात आज नागरिकांना शासकीय दवाखाना म्हटलं तर तिथे उपचारासाठी जाणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकणे ही भावना सर्वांच्या मनात आली आहे.
अपुरी उपचारव्यवस्था, डॉक्टर व रुग्णामध्ये अपुरा संवाद यामुळे उपचार करणाऱ्या नागरिकांचा रोष शासकीय रुग्णालयाप्रती वाढणारच.
म्हणजे या स्थितीचा फायदा घेत काही राजकीय नेत्यांनी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी शहरात खाजगी जम्बो हॉस्पिटल तयार करायचे व शासकीय रुग्णालयात उपचार करीत असलेल्या नागरिकांना तिथेच मरु द्यायचे का असा प्रश्न आम आदमी पक्षाच्या पारोमिता गोस्वामी यांनी शासनाला विचारला आहे.
त्या खाजगी कोविड सेंटरला परवानगी मिळावी यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्या करायच्या, स्वतःचे भले करायचे काय चाललंय या कोरोनाला तर तुम्ही बाजार बनविला आहे हे आम आदमी पक्ष कदापि सहन करणार नाही, श्रीमंत असलेल्या पुण्यात मात्र शासकीय जम्बो कोविड रुग्णालय आणि गरीब असलेल्या चंद्रपुरात मात्र खाजगी जम्बो रुग्णालय हा कुठला न्याय?
चंद्रपूरकरांना चांगल्या उपचारापासून वंचित करायचे हे आम्हाला मान्य नाही, हे आधी थांबावं यासाठी 22 सप्टेंबर मंगळवरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पारोमिता गोस्वामी या लाक्षणिक उपोषण करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here