पोलीस स्टेशन डायरीवर बिनधास्तपणे झोपी गेला पोलीस हवालदार

0
118

चिमूर पोलीस स्टेशन च्या स्टेशन डायरीवर बिनधास्तपणे झोपी गेला पोलीस हवालदार

ठाणेदार नियम लावण्यात बेजबाबदार

चंद्रपूर : – दिनांक.२१/०९/२०२० चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय , महिला भरोसा सेल कार्यालय , तथा पोलीस निरीक्षक कार्यालय चिमूर असतांना हि तिन्ही कार्यालये एकाच इमारतीमध्ये आहे.या चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात भिसी , शेगाव , चिमूर हे तिन्ही पोलीस स्टेशन येत असून कार्यालयात जाण्यासाठी स्टेशन डायरी ओलांडून पुढील कार्यालये गाठावी लागतात.या अशाप्रकारच्या पोलीस हवालदार यांच्या बिनधास्तपणे सैरा – वैरा झोपण्याने महिला पोलीस कर्मचारी यांच्यावर रात्र पाळीच्या वेळेस कामावर कार्यरत असतांना काय परिस्थिती निर्माण होत असेल ?
हे झोपी गेलेले पोलीस हवालदार राजू बावने असून नेहमी डायरीवर फिर्यादि सोबत असभ्य शब्दरचना करीत असतात.याकडे पोलीस निरीक्षक यांचे दुर्लक्ष होत असून नेहमी जर अशेच सुरु राहिले तर या पोलीस स्टेशन ला सिनेमा सारखे स्टंट ऍक्ट पोलीस स्टेशन म्हणावे लागेल अशी या फोटो वरून दशा दिसू लागली आहे.आज सर्वत्र कोरोना या महारोगाने बघावे तिकडे थैमान घातले आहे.या भयावह परिस्थितीत बिनधास्तपणे या पोलीस हवालदार ला झोप लागली तरी कशी असावी हा फोटो सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टिपलेला आहे.अशाप्रकारचे दृश्य पाहून जनता काय विचार करेल असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here