” 300 रु द्या ” आशा वर्कर चे 5 व्या दिवशी मनपा समोर थाळीनाद आंदोलन.

164

चंद्रपूर

राष्ट्रीय आरोग्य अभियनाअंतर्गत कोवड -19 सर्वेक्षण व पल्स आक्सिमि टर चाचणी ,माझे कुटुंब,माझी जबाबदारी या मोहिमअंतर्गत घरा घरात जाणीव जागृती आरोग्याची तपासणी करणे इत्यादी सर्वे करतांना अल्प मोबदला मिळत असून , आशाना व गट प्रवर्तक महिलांना प्रतिदिन 300 रू.देण्याच्या मागणीला घेऊन आय टक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात 16 सप्टेंबर पासून चंद्रपूर महानगर पालिका कार्यालय समोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे , सोमवार ला पाच दिवस होऊनही मनपा प्रशासनाने दखल न घेतल्याने आशा वर्कर आक्रमक भूमिका घेत थाळीनाद आंदोलन करून तीव्र नारेबाजी केली. व प्रतिदिन 300 रू.दिल्या शिवाय कोरो ना चे काम करीत नाही अशी भूमिका घेतल्याने आरोग्य विभाग प्रशासन अडचणीत सापडले आहे.
यापूर्वी सुद्धा मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मानधन वाढीसाठी 18 दिवस संघटनेने राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता राज्य सरकारने आशा 2000 रू. व गट प्रवर्तक महिलांना 3000 रू.मासिक मानधन वाढ लागू करण्याचे शासकीय आदेश काढले परंतु एक वर्ष होऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही.परत कोरों ना काळात काळात अनेक सर्वे आशा वर्कर वर लादून फक्त रोज 32 रू.देऊन त्यांची पिळवणूक करीत आहेत त्यामुळे आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांना मध्ये तीव्र नाराजी आहे.
ठाणे ,मुंबई ,नांदेड,सोलापूर, पिंपरी चिंचवड,बदलापूर,वसई,विरार अंबरनाथ आदी महानगर पालिका आपल्या निधीतून कोरो ना काळात काम करतांना आशा वर्कर ला प्रतिदिन 300 रू.मानधन देतात तर चंद्रपूर मनपा प्रशासनान का लागू करत नाही असा सवाल शहरी आशा वर्कर करीत आहेत . त्वरित निर्णय न झाल्यास 23 सप्टेंबर 2020 रोजी जिल्हा व्यापी कामबंद आंदोलन करून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय समोर विशाल धरणे आंदोलन करण्याचा इशारा आय टक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे,शहर सचिव प्रतिमा कायर कर,प्रमिला बावणे,सविता गटलेवार,वैशाली जुपा का,सोनाली हजारे, उषा उराडे, सुकेशनी शंबरकर यांनी दिला आहे.