३०० रुपये रोजी द्या : अन्यथा संपावर जाऊ,आशा गटप्रवर्तकांनी दिला इशारा.

0
294

काम जोखमीचे आहे.३०० रुपये रोजी द्या. अन्यथा संपावर जाऊ,आशा गटप्रवर्तकांनी दिला इशारा.

कोरपना प्रतिनिधी:- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.त्यासाठी ३०० रुपये रोज देण्यात यावा या मागणीसाठी आशा व आशा गटप्रवर्तकांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ स्वप्नील टेंभे यांना निवेदन देण्यात आले.आशा व गटप्रवर्तक नियमित कामे करण्यास तयार आहेत.त्या कामाचा त्यांना मोबदला मिळत आहे.मात्र कोरोना काळात शासनाने जी कामे करून घेतली,त्याचा निश्चित मोबदला ठरविला नाही.या कामाची दखल घेवून मोबदला वाढवून देण्यात येईल,अशी अपेक्षा आशांना होती.शासनाने ३०० रूपये रोज दिला तरच माझे कुटुंब माझी जबाबदारी चा सर्व्हे करणार,अन्यथा नाही अशा इशारा आशा वर्कर व गटप्रवर्तक आयटक संघटना कडून निवेदनातून देण्यात आला.यावेळी कोरपना तालुक्यातील आशागटप्रवर्तक
फरजाना शेख,छाया खैरे,सुनिता मडावी,सविता जेनेकर ,रेखा
शिंदेकर,व आशावर्कर योगीता वांढरे उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here