यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केली जात आहे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या नातलगांची भोजन व्यवस्था

154

       चंद्रपूरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या नातलगांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात यावी असे आदेश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले होते. आदेश मिळताच यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या नातलगांसाठी निशुल्क भोजन उपक्रम सुरु केला असून या उपक्रमाअंतर्गत दररोज कोरोना बाधीत रुग्णांच्या नातलगांना भोजन उपलब्ध करुन दिल्या जात आहे.

        संपुर्ण देशासह चंद्रपूरातही कोरोना बाधीतांच्या संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. कोरोणाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने उपायोजना केल्या जात आहे. मात्र रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेता शासकीय व्यवस्था आता अपू-या पडू लागल्या आहे. हि वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. असे असले तरी प्रत्येक  कोविड रुग्णाला योग्य उपचार मिळावा या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु आहेत. चंद्रपूरातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये बाहेर गावातील रुग्णांचाही समावेश आहे. त्यामूळे या रुग्णांचे नातलगही येथेच थांबले आहे. मात्र या नातलगांच्या अनेक अडचणी आहे. त्यांच्या भोजनाची चांगलीच गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातलगांच्या भोजनची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात यावी असे आदेश आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड सेंटरच्या पाहणी दरम्याण कार्यकर्त्यांना दिले होते.

   आदेशप्राप्त होताच रुग्णांच्या नातलगांची सेवा करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते तत्पर्तेने सज्ज झाले असून त्यांच्या वतीने कोविड सेंटर येथे रुग्णांच्या नातलगांसाठी दररोज भोजन उपलब्ध करुन दिल्या जात आहे. या उपक्रमासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले असून सकाळी 11 वाजेपर्यंत रुग्णांच्या नातलगांची नोंदणी करुन घेतल्या जात आहे. नोंदणी झालेल्या नातलगांना दुपारला कोविड सेंटर येथे भोजन डब्बा उपलब्ध करुन दिले जात आहे. आज या उपक्रमाचा चौथा दिवस असून पूढेही हा उपक्रम सुरुच राहणार आहे. आवश्यकतेनूसार भोजन डब्बांच्या संख्येत वाढही केली जाणार असल्याचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सांगण्यात आले आहे. संकट काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सुरु असलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.