घुग्घुस येथील इसम “बेपत्ता की आत्महत्या ” वर्धा नदीच्या पुलावर आढळली त्याची सायकल !

260

घुग्घुस (चंद्रपूर) :

येथील लाॅयड्स मेटल कंपनीतील कंत्राटी कामगार सुनिल सिताराम वाढई (४५) रा. सवारी बंगला, घुग्घुस हा मंगळवारला दुपारी २ वाजता दरम्यान घरुन निघुन गेला. काही दिवसापासुन तो मानसिक नैराश्यात असल्याचे बोलले जात आहे.
लाॅयड्स मेटल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणुन २० वर्षापासुन कामकरीत होता. त्यांना पत्नी व दोन मुले आहे .
घुग्घुस वर्धा नदीच्या पुलावर त्याची दुपारी दरम्यान सायकल आढळुन आली. त्यामुळे सुनिल वाणी यांनी वर्धा नदीच्या पात्रात उड़ी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुनिल वाढई सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेणे सुरु केले व घुग्घुस पोलीस स्टेशन येथे बेपत्ता असल्याची माहिती दिली.
त्यामुळे आज बुधवारला घुग्घुस पोलीसांनी शोध मोहिम सुरु केली परंतु मॄतदेह आढळला नाही त्यामुळे शोध मोहिम सुरुच होती. सुनिल वाढई यांचा मॄतदेह न मिळाल्याने सदर इसम हा बेपत्ता कि आत्महत्या असा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
काही दिवसापुर्वीच घुग्घुस येथील अमित पोले या युवकाने आत्महत्या केली होती. तर यांचे कुटुंब भयभीत असतांनाच घुग्घुस येथील एक इसम बेपत्ता असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.