प्रतिबंधात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मानधन वाढ या मागणीचा पाठपुराव्याला यश:- विशाल निंबाळकर* *नगरसेवक*

0
191

चंद्रपूर

सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार, बल्लारपूर तथा माजी पालकमंत्री* यांच्या सूचनेप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आरोग्य सेविकांच्या मानधनात वाढ केली असुन आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामे करणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना आता प्रतिमाह ४०००/- रुपये तथा शासन तर्फे १००० रुपये अस एकूण ५००० रुपये मानधन दिले जाणार आहे. *नगरसेवक विशाल निंबाळकर हे या मागणीचा सतत पाठपुरावा करत होते.* अखेर या संबंधी श्री. देवरावजी भोंगळे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष ग्रामीण तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर उपमहापौर श्री. राहुलजी पावडे नगरसेवक श्री विशाल जी निंबाळकर श्री. ब्रिजभूषण जी पाझारे माजी जिल्हा परिषद सभापती चंद्रपुर यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मागणी मान्य केल्याबद्दल उपस्थित आशा स्वयंसेविकांनी श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार श्री.देवराव दादा भोंगळे सौ.राखीताई कंचर्लावार श्री. डॉ. मंगेशजी गुलवाडे श्री. राहुलजी पावडे श्री. विशालजी निंबाळकर श्री.ब्रिजभूषणजी पाझारे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here