“देवा रे देवा”…! कुठे शोधू “गडचांदूर माझा”

0
175

 

गडचांदूर (चंद्रपूर) :

गडचांदूर नगरपरिषदेत सुरू असलेली हिटलरशाही व भोंगळ कारभारामुळे अख्ख्या शहराची वाट लागत आहे. कोरोना पाठोपाठ आता नागरिक डेंग्यू-मलेरीयाने हैराण झाले असून साफसफाई करताना शहरातील काही ठिकाणचे फोटो,व्हिडीओ काढून फेजबुक, व्हाटसअपवर, टाकून नगरपरिषद स्वतःची पाठ थोपटून घेत असल्याचे पहायला मिळत आहे.वास्तविक पाहता येथील जवळपास सर्वच प्रभागात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे.महिन्या भरात डेंग्यू-मलेरियाने चार निष्पाप नागरिकांचे बळी गेले तर कित्येक रोगग्रस्त आहे.काही भाग वगळता बऱ्याच ठिकाणी नाली सफाई,किटकनाशक फवारणी होत नसल्याने नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या कारभारांविषयी कमालीचा राग पहायला मिळत असून “हे देवा…..!कुठे नेवून ठेवलाय गडचांदूर माझा” अशी जळजळीत भावना व्यक्त होत आहे.
येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये खुद्द नगराध्यक्षाच्या निवासस्थाना जवळील “वांढरे ले-आऊट” मध्ये मागील दीड ते दोन महिन्यांपासून नाली सफाई,फवारणी झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणने असून आजाराच्या भीतीने शेवटी येथील नागरिकांनी वर्गणी गोळा करून कीटकनाशक फवारणी केल्याची बाब पुढे आली आहे.याठिकाणच्या जवळील शाळेत कॉरंटाईन सेंटर असल्याने आगोदरच नागरिक दहशतीत वावरत आहे.यावर अशाप्रकारे पसरलेली अस्वच्छता नागरिकांना जिक्रीचे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.नगराध्यक्षांच्या प्रभागातच जर अशी परिस्थिती असेल तर शहराच्या बाबतीत न बोललेलेच बरे.कोरोनाच्या सुरुवाती पासूनच शहरातील नागरिक अस्वच्छेमुळे हैराण असून कित्येकदा तोंडी,लेखी तक्रारी केल्या,आंदोलने झाली मात्र यांना काहीच का फरक पडत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.निव्वळ काही ठिकाणी साफसफाई,फवारणी करतानाचे व्हिडिओ,फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकून यांच्या काही मोजक्या भक्तांकडून प्रशंसा मिळवायची,हाच एककलमी कार्यक्रम सध्या नगरपरिषदेने सुरू केल्याचे आरोप होत आहे.डेंग्यु-मलेरिया पासून बचावासाठी नगरपरिषदेने त्वरित नाली सफाई,फवारणी करावी अशी मागणी वांढरे ले-आऊटच्या नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here