उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यु : काय सुरू काय बंद !

0
839

चंद्रपूर –

चंद्रपूर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जिल्हा प्रशासनाने 7 दिवसांचा जनता कर्फ्यु घोषित केला आहे.
कोरोनाची साखळी या 7 दिवसांच्या जनता कर्फ्युने नक्कीच तुटणार असा विश्वास प्रशासनाला आहे.
हा जनता कर्फ्यु शुक्रवार 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यन्त असणार ज्यामध्ये सर्व दवाखाने, औषधी दुकाने, कृषी केंद्र, पशु खाद्य दुकाने, सर्व शासकीय कार्यालये, बँक, एमआयडिसी परिसरातील उद्योग, घरपोच सेवांसह, दूध वितरण, वर्तमानपत्रे, गॅस वितरण, पेट्रोल पंप, हॉटेल मधली पार्सल सुविधा, परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी व त्यांचेसह येणारे पालक यांना परवानगी राहील सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक.
त्या व्यतिरिक्त सर्व किराणा दुकान, भाजीपाला व फळे, सर्व प्रकारचे व्यापारी आस्थापना/दुकाने उपरोक्त कालावधीत पूर्णतः बंद राहतील.
जिल्ह्यातील पानठेले, चहा टपरी, हातगाडी, फुटपाथ वरील चायनीज सह इतर सर्व प्रकारचे आस्थापने बंद राहतील.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने हा जनता कर्फ्यु पाळावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here