पोलिसांची मोठी धाड : देशी दारुसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

0
340

 

बल्लारपूर (चंद्रपूर) :

  •    स्थानिक गुन्हे शाखेच्या( LCB)पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मूर्तिजापूर जी, अकोला हुन महिंद्रा पिकअप वाहन क्र, MH 10 – CR – 5950 या वाहनाने देशी दारू ची खेप येत असल्याची खात्री लायक माहिती मिळाली.
    त्या आधारे बल्लारपूर पेपर मिल समोर LCB पोलिसांनी सापळा रचून चंद्रपूर हुन येत असलेल्या महेंद्र पिकअप ला थांबवून झडती घेतली असता त्यात 26 पांढऱ्या बोऱ्यात कांदे व 34 पांढऱ्या बोऱ्यात अवैध देशी दारू आढळून आली. त्यांना जप्त करून पोलीस ठाण्यात आणुन दोन्ही आरोपी चालक शुभम प्रमोद मिराशे (22) बाजूला बसलेला अभिलाष प्रभाकर वैद्य दोनही रा, धानोरा वैद्य, ता, मूर्तिजापूर, अकोला यांना ताब्यात घेऊन कलम 65 अ 83 गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई 23 सप्टेंबर चा रात्री 2 च्या दरम्यान करण्यात आली.
    10लाखाची देशी दारू ,9लाखाची बोलेरो महिंद्रा पिकअप, एक मोबाईल, आणि कांदे असे मिळून अंदाजे 20 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
    जिल्हात दारूबंदी असतांना सुद्धा दारू येतेच कशी असे प्रश्न येत होते, दारू तस्कर लॉकचा काळात ही अत्यावश्यक सेवा चा वाहनाचा उपयोग करून दारू पुरवठा करीत आहे, बोलेरो वाहनात अवैध रित्या देशी दारू ची खेप कोणत्या होलसेल दारू विक्रेता ला देण्यात येत होता याचा पुढील तपास ठाणेदार शिवलाल भगत यांच्या नेतृत्वाखाली API विनीत घागेकरीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here