गावातील तरुणाईचा व ग्रामपंचायतचा पुढाकार* शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने यशस्वी*

0
168

 

ब्रम्हपुरी :

मनात सामाजिक ऋण फेडण्याची अभिलाषा असेल तर मार्ग दिसेल या उक्तीप्रमाणे ब्रम्हपुरी पंचायत समिती अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा मरारमेंढा व गावातील तरूणाई यांनी पुढाकार घेऊन *शाळा बंद पण शिक्षण सुरू* हा उपक्रम गतमहिन्यापासून यशस्वी करून दाखविला आहे. कोरोना जागतिक महामारीने संपूर्ण व्यवस्था विस्कळीत झाली असतांना आपल्या गावातील चिमुकले विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहू नयेत या भावनेने शाळेचे मुख्याध्यापक श्री ए.आर. ठाकूर व स.शि. एन. सी. ठक्कर यांनी गावातील तरूणाईला साद दिली व तितक्याच तत्परतेने तरुणाईने प्रतिसाद दिला.

कोरोना काळात प्राथमिक स्तरावर आॅनलाईन – आॅफलाईन प्रयत्न सुरू असतांनाच शाळेतील शिक्षक , शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यकारिणी यांनी गावातील शिक्षणप्रेमी तरूणांना विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग सुरू करण्याचे आवाहन केले. सदर उपक्रमासाठी आवश्यक ती मदत करण्याचे मान्य करून नियोजन करण्यात आले. नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार गत आॅगष्ट महिन्यापासून गावातील बुद्धविहार , समाजमंदिर , हनुमान मंदिर , ग्रामपंचायत व्हरांडा अशा सर्व मोकळ्या जागेत शारीरिक अंतर व प्रशासनाचे दिशानिर्देश पालन करून अभ्यासवर्ग व संस्कारवर्ग सुरू करण्यात आले.

यांत शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व पालकांनी देखिल उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामपंचायत सरपंच श्री दुधराम नैताम , उपसरपंच गौतम सोनडवले , सदस्य रामभाऊ पिसे, करूणा सोनडवले , अमृता गावतुरे , मोहुर्ले , सचिव अनिल हरमवार यांनी वर्गातील शिक्षणप्रेमी व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटाईझर व मास्कचे वितरण केले. तद्वतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेशभाऊ पिसे उपाध्यक्ष अस्मिता गणविर व इतर सदस्यांनी अभ्यासवर्ग संचालन तथा देखरेखीची जबाबदारी घेतली. शिक्षणप्रेमी स्वयंसेवक श्रीकांत पिसे , सुषमा जेंगठे , सोनल जेंगठे , राखी जेंगठे , पंकज मोहुर्ले , कार्तिक मोहुर्ले , स्नेहल मोहुर्ले , अक्षय जेंगठे यांनी उपक्रमासाठी समर्पण देऊन मुर्त स्वरुप आणले. सदर उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षकगण ठाकूर , ठक्कर शालेय पोषण आहार कर्मचारी सुधाकर रासेकर , डाॅ. रायपुरे , पालकमंडळी व ग्रामस्थांनी सामुहिक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here