सुपरवाईजरला कामावरुन काढल्यामूळे यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे सिएसटिपीएसमध्ये काम बंद आंदोलन

212

चंद्रपूर

       कोणतीही पूर्व सुचना न देता अडोरे कंपणीने सुपरवाईजरला कामावरुन कमी केल्याने आज यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेच्या वतीने सिएसटिपीएस येथे काम बंद आंदोलन करण्यात आले. यात अडोरे कंपणीतील सर्व सुपरवाईजर, अभियंता, वाहण चालक, स्ट्रोर किपर, इलेक्ट्रिशन यांनी आंदोलनात सहभाग घेतला परिणामी आज दिवसभर सिएसटिपीएस येथील अडोरे कंपणीचे काम बंद राहले. यावर आज कोणताही तोडगा न निघाल्याने उद्याही हे आंदोलन सुरुच राहणार आहे.

  विजोत नळे हा सिएसटिपीएस येथील अडोरे कंपणीमध्ये सुपरवाईजर म्हणून कार्यरत आहे. मात्र याला कोणतीही पूर्व सुचना न देता विजोत नळे याला अडोरे कंपणीने कामावरुन कमी केले. त्यामूळे सदर सुपरवाईजरला कामावर पूर्ववत करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली होती. मात्र त्याला कामावर न घेतल्याने तसेच कामावरुन काढण्याचे कारण स्पष्ट न केल्याने संपप्त झालेल्या विज कामगार सेनेच्या वतीने आज सिएसटिपीएस येथील मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरु करण्यात आले. या आंदोलनात अडोरे कंपणीतील सर्वच कर्मचा-यांनी सहभाग घेतल्याने आज दिवसभर अडोरे कंपणीचे काम बंद राहले. रात्री उशीरापर्यंत यावर तोडगा न निघाल्याने विज कामगार सेनेचे कामबंद आंदोलन सुरुच आहे. कामावरुन काढण्यात आलेला सुपरवाईजर हा मागील दिड वर्षापासून येथे कार्यरत आहे. मात्र अचानक त्याला कोणतेही कारण न सांगता कामावरुन काढण्यात आल्याने त्याच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. त्यामूळे सदर सुपरवाईजरला पून्हा कामावर घेण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी पूर्ण होई पर्यंत आंदोलन सुरुच राहणार असा ईशाराही त्यांच्या वतीने देण्यात आला आहे. सदर आंदोलन यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार सेनेचे अध्यक्ष हरेमन जोसेस यांच्या नेतृत्वात युनियनचे प्रकाश पडाल, प्रकाश चालक, किशोर धामनकर, कार्तिक वानखेडे यांच्या प्रमूख उपस्थितीत सुरु आहे.