जनता कर्फ्यु फक्त व्यापाऱ्यां साठीच आहे काय ? नागरिकांचा उद्दिग्न सवाल

0
373

 

घुग्घुस (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग अत्यंत झपाट्याने वाढत असल्यामुळे तसेच नागरिकांच्या मृत्यूदरात ही वेगाने वाढ होत असल्यामुळे व वैद्यकीय सुविधा तोकडी पडत असल्याने
हतबल झालेल्या प्रशासनाने पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक घेऊन 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर पर्यंत साथ दिवसाचे जनता कर्फ्यु संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात जाहीर केले.
आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मोठ्या आणि छोट्या व्यापाऱ्यांनी जड अंतकरणाने या जनता कर्फ्यु मध्ये शत – प्रतिशद सहभाग घेतला.
तर दुसरीकडे कर्फ्यु लागत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना महागड्या भाजीपाला व साहित्याचा भार जबरीने सोसावा लागला आणि हातावर आणून पानावर खाणाऱ्या गोरगरीब जनतेला उपासमारीचे चटके सहन करावा लागत आहे.
मात्र जनता कर्फ्युला बैठकीत समर्थन देणाऱ्या भाजप पक्षाला कोरोनाशी व जनता कर्फ्युशी काही घेणे देणे नसून नागरिकांच्या जिवापेक्षा राजकारण महत्वाचे असल्याचे परत एकदा त्यांच्यातर्फे सिद्ध करण्यात आले.
जनता कर्फ्युच्या पहिल्याच दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे प्रयास हेल्थ क्लब येथे सेवा सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये शेकडोंच्या संख्येने महिलांना जमवून छत्री वाटप करण्यात आले.

कधी वाढदिवस, कधी आंदोलन या – ना त्या कारणाने संचारबंदी, सामाजिक अंतर, तोंडाला मास्क न लावणे असे सतत नियमांचा फज्जा उडविण्यात येत असते.

त्यामुळे जनता कर्फ्यु हे फक्त व्यापारी व नागरिकांन साठीच आहे का ?

तसेच नेत्यांना कोरोनाने सूट दिली आहे का ?

या कार्यक्रमातुन कोरोनामूळे नागरिक बाधीत होऊन मृत्युमुखी पडल्यास त्याला दोषी कोण ?
असा संतप्त सवाल घुग्घुस जनतेतर्फे करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here