जुन्या वादातून घडले ते “दुहेरी हत्याकांड”

0
237

चंद्रपूर : शहरातील रयतवारी येथील बीएमटी चौकात भर दुपारी एका युवकाची घरात घुसून धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
या हत्येला काही तास उलटले नाही त्यावेळीच मृतकांच्या नातेवाईकांनी आरोपीच्या काकाला मारहाण करीत खून केला.
पोलिसांनी तात्काळ करन केवट या पहिल्या हत्येतील आरोपीला अटक केली, नंतर दुसऱ्या हत्येतील आरोपींना सुद्धा पोलिसांनी अटक केली.
हत्येचं नेमकं कारण म्हणजे केवट व शेख यांच्यातील जुना वाद होता अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here