रुग्णांना उत्कृष्ठ उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा : खासदार बाळू धानोरकर*  

0
192

 

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हजारो लोक बाधित होत आहे. दिवसेंदिवस रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्यामुळे तालुका स्तरावर कोविड रुग्णालय उभारून वेकोलि चे लालपेठ, सास्ती, माजरी व घुग्गुस येथील राजीव रतन हि क्षेत्रीय रुग्णालय व उद्योगातील अंबुजा, माणिकगड, अल्ट्राटेक, ए. सी. सी, बिल्ट इंडस्टीज येथिल तज्ञ डॉक्टर व परिचारिकांची सेवा कोविड रुग्णांकरिता अनिवार्य करावे तसेच पालकमंत्र्यांनी घोषित केलेल्या १००० बेडच्या रुग्णालयात १०० टक्के बेड ऑक्सिजन व अतिदक्षता बेड ठेवण्यात यावा. तसेच हि परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरता रुग्णांना उत्कृष्ठ उपचाराकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केले.

यावेळी आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अधिष्ठाता डॉ. मोरे, चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, अशोक मत्ते यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील एम. बी. बी. एस डॉक्टरांना सेवेत घ्यावे, आरोग्य विभागात परिचारिकेची वाढती मागणी लक्षात घेत तातडीने १०० परिचारिकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा, तसेच या परिस्थितीत रुग्णांकडून औषध मोठ्या प्रमाणात बिल आकारात आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या आरोप रुग्णाचे नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्याकरिता एक पथक स्थापन करावे, प्रस्तावित १००० बेडचे जे रुग्णालय आहे. ज्यात ४५० बेड महिला रुग्णालय, ४०० सैनिक शाळा, वरोरा ५०, पोंभूर्णा ५० व ब्रम्हपुरी ५० बेड  या सर्व ठिकाणी ऑक्सिजन व अतिदक्षता बेड ठेवण्याच्या    महत्वपूर्ण सूचना त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्यात.

त्याच प्रमाणे जनता कर्फ्यू मध्ये पोलीस विभागामार्फत वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी होत आहे. राज्यात साडेतीन हजाराच्या घरात पोलीस अधिकारी कर्मचारी कोरोनाने बाधित झाले आहेत. २०० च्या वर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मृत्यू झाला असून शेकडो कर्मचारी कोरोनाने गंभीर आहेत. त्यामुळे पोलीस विभागावर देखील मोठा धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे चंद्रपूर येथील पोलीस विभागाला कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान कोरोनाची लागण होण्याचा धोका नाकारता येऊ शकत नाही. त्यासोबतच सर्वसामान्य जनतेला यामुळे टेस्टिंग करण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व आरटीओ मार्फत पीयूसी, विमा बाबत मुदतवाढ देण्यात आली आहे.  त्यामुळे हि मोहीम तूर्तास थांबविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना केल्यात.

त्यासोबतच एम. बी बी एस चे व्दितीय, तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थी यांना असिस्टन्ट  डॉक्टर म्हणून यांची आवश्यक ठिकाणी सेवा घ्याव्यात, तसेच कोरोना बाधितांच्या नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळण्याकरिता माहिती केंद्र उभारले आहे. तेथील टेलिफोन बंद असल्यामुळे नातेवाईकांची गैरसोय होत आहे. तो ताबडतोब बदलून योग्य माहिती मिळण्याकरिता सेंट्रल  मॉनिटरिंग सिस्टीम लावून समुपदेशक नेमता यावेत,  शासकीय महाविद्यालयात एकून १२१ डॉक्टर कार्यान्वित आहेत. त्यातील प्रत्येक्षात किती डॉक्टर सेवा देत आहेत व किती डॉक्टर सेवेत नाहीत. सेवा देणारे डॉक्टर कोणत्या ठिकाणी सेवा देत आहेत याचा लेखाजोखा खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ मोरे यांना मागितला. व प्रत्येक रुग्णालयासमोर माहिती फलक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. तसेच रेमडीसीवर इंजेक्शन शासकीय दराने सर्वाना उपलब्ध करावे अशाही सूचना केल्या.

आमदार सुभाष धोटे यांनी चंद्रपूर शहरावर जिल्ह्यातून येणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची व्यवस्था त्वरित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णांची माहिती मिळण्याकरिता यंत्रणा उभी करावी. त्याचप्रमाणे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोविड व नॉन कोविड अशा पद्धतीने उभी कराव्या तसेच स्त्रीरोग तज्ञ  व बालरोगतज्ञ   यांना कोरोना उपचारात न घेता नॉन कोविड सेवेत त्यांना ठेवण्याच्या  सूचना त्यांनी केल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here