विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्तीचा लाभा मिळवून देण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेतर्फे जनजागृती

0
178

   चंद्रपूर

        2 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणा-या व २०२०  मध्ये १० वि बोर्डाच्या परिक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना विद्याधन शिष्यवृत्ती दिली जाणार असून या शिष्यवृत्तीचा अधिकाधिक विदयार्थ्यांना लाभ घेता यावा या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेच्या वतीने शाळा महाविद्यालयात सदर योजनेबाबत जनजागृती केली जात असून पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले जात आहे. सरोजीनी दामोदरन फाउंडेशन बेंगळुर आणि यंग चांदा ब्रिगेड विद्यार्थी शाखेतर्फे सुरु असलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचाही उत्स्फृत प्रतिसाद लाभत आहे.

  सरोजीनी दामोदरन फाउंडेशन बेंगळुर महाराष्ट्र शिष्यवृत्ती २०२० कार्यक्रम अतंर्गत ईयत्ता ११ विच्या विद्यार्थ्यांना अर्ज मागविण्यात आले आहे. हि शिष्यवृत्ती दारिद्ररेषेखालील विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून दोन लाख रुपयांखाली वार्षीक उत्पन्न, १० विच्या बोर्ड परीक्षेत  ८५  टक्केपेक्षा अधिक गुण व प्रत्येक विषयात ए क्षेणी असलेले विद्यार्थी या विद्याधन योजनेस पात्र असणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर योजनेस पात्र ठरण्यासाठी ७० टक्के गूण असणे आवश्यक आहे. निवडक विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत ११ वि आणि १२  वि साठी ६  हजार रुपये प्रति वर्ष दिले जाणार आहे. तर या विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम राहिल्यास त्यांच्या आवडीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी सदर योजनेंतर्गत प्रतिवर्ष ६ हजार ते १० हजार रुपये दिले जाणार आहे. ही योजना गरजू विदयार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विदयार्थी शाखेच्या वतीने शाळा महाविद्यालयात जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी ३० संप्टेबर पर्यंत संबधीत महाविद्यालयाशी किव्हा जैन भवन जवळील यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष अजय दुर्गे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here