घुग्घूस | कोरोना 175 पार; मृतांची संख्या चार : फोटोसेशन करणा-या नेत्यांना सॅनिटाईजरचा विसर

0
198

 

घुग्घूस (चंद्रपूर) :

जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक शहर असलेल्या घुग्घूस शहरात कोरोना संसर्गाचा प्रसार अत्यंत वेगाने होत आहे.
येथे 175 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, दोन महिला व दोन पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू ही झालेला आहे. मात्र ज्यावेळेस गावात एक ही कोरोना बाधीत रुग्ण नव्हता. त्यावेळेस ACC, WCL या कंपन्यातर्फे गावात वाहना द्वारे सैनिटाईझर करण्यात आले.
व या वाहनामध्ये बसून नेत्यांचे फोटोसेशनही करण्यात आले. आता मात्र सर्वत्र कोरोनाचा प्रसार होत असतांना सगळ्यांनाच गाव निर्जंतुकीकरणाकरिता सॅनेटाईजरचा विसर पडला आहे.

प्रशासनातर्फे कोरोना संसर्गाची चैन तोडण्यासाठी सात दिवसाचा जनता कर्फ्यु 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर पर्यंत लागू करण्यात आले. याला जनतेने जड अंतकरणाने शत – प्रतिशद समर्थन दिले व सहभाग ही घेतला. मात्र, जनतेला कोरोना संसर्गा पासून सुरक्षेचे धडे देणारे मास्क वाटप करणारे जनता कर्फ्यूमध्ये
शेकडो महिलांची गर्दी जमवून
स्वतःहून कोरोना संसर्गाला निमंत्रण देऊन राजकिय छत्रीचे वाटप करतात.
आता या छत्रीपासूनच कोरोना हद्दपार होऊन नागरिकांचा बचाव होणार असल्याची परिसरात खमंग चर्चा शुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here