पंडित दीनदयाल यांनी दिलेल्या विकल्पाचा आता विकल्प नाही*  : *भाजपा नेते प्रमोद कडू

193
चंद्रपूर
 देश पारतंत्र्यात असतांना आपल्याला कोणताही सन्मान मिळाला तरी तो गुलामांचा सन्मान असेल. गुलामांचा कधीच सन्मान होऊ शकतच नाही. त्यामुळे हा देश सर्वप्रथम स्वतंत्र झाला पाहिजे.मी देशासाठी लढणार आणि झटणार असे अभिवचन आपल्या मामांना देत पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा संकल्प करीत देशसेवेत जीवन अर्पण केले. यासोबतच त्यांनी देशात असे राष्ट्रभक्त कार्यकर्ते निर्माण केले की, ज्यामुळे आज जो विकल्प देशाला मिळाला आहे ,त्या विकल्पा पुढे दुसरा विकल्प उरला नाही. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांची आत्मनिर्भर भारत योजना पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे स्वप्न पूर्ण करणारी आहे. शेवटच्या माणसाला केंद्रस्थानी ठेवून मोदींजी कार्य करीत आहेत.असे प्रतिपादन भाजपा जेष्ठ नेते प्रमोद कडू यांनी केले. ते भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा च्या पुढाकाराने होणाऱ्या व्हर्चुअल सभेत प्रमुख वक्ते म्हणून *”पंडित दीनदयाल यांचे एकात्म मानवदर्शन* या विषयावर प्रकाश टाकतांना ते शुक्रवार(२५ सप्टेंबर)ला बोलत होते. यावेळी मंचावर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,व्हर्च्युअल सभा प्रकल्प संयोजक ब्रिजभूषण पाझारे यांची उपस्थिती होती.
प्रमोद कडू म्हणाले,पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवन प्रवास सोपा न्हवता.बालपणी त्यांना मातृशोक झाल्यावर पिताछत्र पण हरपले.१९३७ मध्ये त्यांनी शिक्षणाला बाजूला सारून राष्ट्रसेवेत स्वतःला समर्पित केले.उत्कृष्ठ पत्रकार,लेखक,अर्थशास्त्री म्हणून त्यांची ओळख होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य तळागाळापर्यंत पोहचवत त्यांनी मातृभूमीची सेवा करणारे असंख्य देशभक्त कार्यकर्ते निर्माण केले.पुढे जनसंघांची स्थापना झाल्यावर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सोबत उल्लेखनीय कार्य करीत देशा समोर एकात्म  मानवदर्शन प्रस्तुत केला.१९६७ मध्ये ते जनसंघाचे अध्यक्ष झाले,पण त्यांची हत्या करण्यात आली.भारतमातेचा पुत्र आम्ही गमावला.
पंडित दीनदयाल केवळ शरीर नाही,एक विचार आहे,सिद्धांत आहे,सत्य आहे,सामर्थ्य आहे. मातृभूमीसाठी त्याग करणे,शेवटच्या माणसाची मदत करणे,क्षमा करणे,दुसऱ्यांचे दुःख जाणून घेणे,हेच त्यांचे एकात्म मानवदर्शन असल्याचे ते म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकात ब्रिजभूषण पाझारे यांनी प्रमोद कडू यांचा परिचय करून देत,त्यांचे भाजपाच्या स्थापने पासून भाजपाच्या सत्ता प्राप्ती पर्यंतचे कार्य विशद केले.भारतमातेच्या व
पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सभेला सुरवात करण्यात आली.सभेचे संचालन युवानेते सूरज पेदूलवार यांनी केले,तर प्रशांत विघ्नेश्वर यांनी आभार मानले.यावेळी भाजपा   नेते राजेंद्र गांधी,नगरसेवक राजू अडपेवार,प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेलिवार,प्रज्वलंत कडू,कुणाल गुंडावार,यश बांगडे,अक्षय न्हवाते,सुनील मिलाल,ओम अडगुरवार,शुभम सुलभेवार यांची उपस्थिती होती.