संघटन हीच देशाची संस्कृती…..राजेंद्र गांधी

0
150
चंद्रपूर
या देशात सर्वप्रथम संघटन प्रभू रामचंद्रांनी केले. संघटन ही या देशाची ची संस्कृती आहे.नंतरच्या काळात भगवान कृष्ण झाले.छत्रपती शिवाजी महाराजांनी संघटन उभारून विजय प्राप्त केला.अनेक संतांनी संस्कृती व मातृभूमीसाठी जीवन खर्ची घातले परंतु इंग्रज आल्यानंतर या देशाची संस्कृती संपविण्याचे काम त्यांनी केले. त्या संस्कृतीला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्यासाठी डॉक्टर केशव  बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. या देशाला आपली मातृभूमी व आई समजणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज त्यांनी विविध क्षेत्रात निर्माण केली. त्या बळावर आज हा देश परमवैभव  प्राप्ती कडे जाताना दिसतो. संघटन हीच या देशाची संस्कृती आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गांधी यांनी केले ते भारतीय जनता पार्टी महानगर च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पुढाकारातून सुरू असलेल्या व्हर्च्युअल सभा उपक्रमात *” सेवा कार्यात कार्यकर्त्यांची भूमिका “* या विषयावर आपले विचार मांडताना बुधवार(२४ सप्टेंबर)ला गुरुवारला बोलत होते.
 यावेळी मंचावर भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, व्हर्च्युअल सभेचे संयोजक ब्रिजभूषण पाझारे ,भाजयुमो जिल्हाध्यक्ष (श)विशाल निंबाळकर यांची उपस्थिती होती.
राजेंद्र गांधी म्हणाले, डॉक्टर हेडगेवार यांनी या मातृभूमीला आपली आई मानणारे हजारो प्रचारक तयार केले, परंतु नंतर एका राजकीय पक्षाची गरज त्यांना भासू लागली.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अध्यक्षतेत जनसंघ पक्ष जन्माला आला.श्रद्धेय अटलजी ते अडवाणी आणि अडवाणी ते सुधीर भाऊ असा विचार केला तर भाजपामध्ये या मातृभूमीवर प्रेम करणाऱ्यांची  खूप मोठी शृंखला आहे व होती. भाजपा हा एक विचार आहे.आज भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी करीत आहेत. त्यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित होऊन या देशाला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या घटना होतांना आपण बघतो. मी या भारतमातेचा पुत्र आहो, अशी भावना कार्यकर्त्यांची असायला हवी. पक्षाचा आत्मा पक्षाचा विचार आहे, असे ते म्हणाले. कधीकाळी या देशाचा पंतप्रधान एखाद्या जागतिक स्तरावरील सभेत मागे बसत होता परंतु आज 118 देशाचं नेतृत्व भारत, पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या माध्यमातून करीत आहे. या क्षणांसाठी भाजपातील हजारो कार्यकर्त्यांना त्याग करावा लागला, हे विसरता येणार नाही. सगळ्या लोकांचं लक्ष भाजपाच्या कार्यकर्त्यांकडे आहे. समाजात कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असून त्याग करण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी. समाजसेवेच्या माध्यमातूनच कार्यकर्त्यांनी मोठं व्हावं,असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तुम्ही जसे आहात तसा तुमचा देश आहे. तुम्हाला भाजपा म्हणून ओळखतात. तुमच्या प्रतिभेने भाजपाची पुन्हा ओळख झाली पाहिजे. या देशाचे वैभव परत येत आहे, त्याचा अभिमान बाळगा. हा पक्ष आपला परिवार आहे देशाला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी खारीचा वाटा उचला असे आवाहनही त्यांनी केले. देशात लव जिहाद चे प्रकरण वाढीस लागले आहे. आत्महत्या देखील वाढत आहे.समाजात वाद-विवाद सुरू झाले आहेत. अशा स्थितीत मानसिक कणखरता वाढविली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here