लोकार्पण : आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते खनिज भवनाचे लोकार्पण*

183

चंद्रपूर

     खनिज भवन वरिष्ठ उपसंचालय, भुविज्ञान व खनिकर्म संचालनालय, प्रादेशीक कार्यालयाचे उद्घाटन आज सोमवारी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आयोजीत या छोटेखानी  उद्घाटन सोहळ्याला उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री आदिती तटकरे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, भुविज्ञान व खनिकर्म संचालनालय नागपूरचे संचालक रा. शि. कळमकर, आदिंची व्हिडीओ काॅन्फरंसीक द्वारे उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, वरिष्ठ उपसंचालक सुर्यकांत बडे, भुवैज्ञाणीक औनकारसिंह भौंड आदिंची कार्यक्रमस्थळी उपस्थिती होती.

 चंद्रपूर जिल्हा हा खजीन संपन्न आहे. येथे अनेक भौगोलीक घटनाही घडल्या आहेत. त्यामूळे या जिल्हाला भौगोलीकदृष्टा विशेष महत्व आहे. आता या सर्व परिस्थीतचा अभ्यास करण्यासाठी  सोईसुविधांनी उपलब्ध असे खनीज भवण साकरण्यात आले आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांचा कारभार या कार्यालयातून चालणार आहे.  आज या भवणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते फित कापून या खनिज भवनाचे उद्घाटण करण्यात आले. यावेळी येथील अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संपूर्ण ईमारतीची पाहणी करत माहिती जाणून घेतली. येथील मायक्रोस्कोपचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करुन त्याबात माहिती घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ईमारतीतील प्रत्येक कार्यालयाची पाहणी करत तेथील अधिका-यांची भेट घेतली. चंद्रपूरच्या विकासात खनीज संपत्तीचाही मोठा वाटा आहे. त्यामूळे या नव्या कार्यालयात नव्या जोशाने काम करत येथील अधिकारी कर्मचारी यांच्या वैचारिक व कार्यक्षमतेतून   हे कार्यालय खनिज व भुविज्ञाण क्षेत्रात नवी क्रांती घडविणारे ठरावे अशी आशा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.