झुंज : वन्यप्राण्यांच्या झुंजी मध्ये बिबट्याचा मृत्यू , लोंढोली परिसरातील घटना

0
180

 

 

सावली

सावली तालुक्यातील लोन्ढोली गावामध्ये घडली. तालुक्यातील अनेक गाव चोहोबाजूंनी जंगल व्याप्त असल्यामुळे सध्या तालुक्यात अनेक गावाला वाघ व बिबट्या ची दहशत पसरलेली असून काही हिंस्त्र घटना सुद्धा घडले आहेत .व्याहाड बुज कापसी परिसरातील कापसी गावातील दहा वर्षीय मुलावर बिबट्या ने हमला करून त्याला ठार केल्यानंतर ची अंतरगाव ला बिबट्याचा मृतदेह आढळला हे सावरासावर होताच आज सकाळच्या व्याहाड खुर्द उपवनपरीक्षेत्र शिरशि बीट कक्ष क्र १५३४ लोण्ढोली बस स्टँड कडून जाणारा पांदण रस्ता याला शेतशिवार व वन विभागाचा घेर असल्याने वन व्याप्त परिसर असल्यामुळे लोंढोली येथील कक्ष क्रमांक १५३४ व जवळ शेत शिवार सीमा असलेल्या या परिसरात गावपासून ८०० मिटर च्या अंतरावर बिबट्याचा मादी मृतदेह आढळला. लोंढोली व परिसरातील आसपास ची गावातील ग्रामस्थांना माहीत होताच बघन्यासाठी एकच गर्दी करण्यात आली सदर घटना सकाळच्या सुमारास असल्यामुळे सिरसी येथील वनरक्षक रामभाऊ चौधरी यांना गावकऱ्यांनी माहिती दिली.त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली समस्त वनाधिकारी व चमू घटना स्थळी येऊन पंचनामा केला यात बिबट्या मादी व वन्यप्राणी यांची झुंज झालेली समजले.मृत्यु झालेल्या बिबट्याच्या मानेला, पोटला,मागील दोन पायाच्या मध्ये व दात आणि नख तुटले होते त्यामुळे मृत्यु झाले असे प्राथमिकता परिक्षणावरून सांगितल्या जात आहे तर ते बिबट पाणी पिण्याकरीता आल्याचे त्याच्या पायाच्या ठस्यावरून समजते.व जवळच जागेची धुमाकूळ दिसते त्यातच एक नख आढळून आला. परीसरात बिबट्या व वाघ यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बिबट्याच्या व वाघ यांच्या घटनेत वाढ होतांना दिसतो आहे. बिबट्याचा झुंजीत मृत्यु झाले असले तरी बिबट्याच्या उतरनिय तपासनी अखेर माहिती होईल असे विभागाकडून वर्तविले जात आहे वरील मृतक बिबट्याला पीएम करिता चंद्रपूर येथे नेण्यात आले .मात्र कापशी व्याहाड चा हिंस्त्रक बिबट्यांचा अजूनही शोध लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे .सदर घटनेचा तपास सावली वनपरिक्षेत्र अधिकारी कामडि साहेब .यांचे मार्गदर्शन खाली उपवनपरीक्षेत्र अधिकारी बुराडे व वनकर्मचारी चौधरी व चमु टीम करीत आहेत.
‘सदर पाहनीत व चौकशी केली असता बिबट्याला झालेल्या जखमा,अवस्था व जागेची धुमाकूळ पाहता झुंज होऊन मृत्यु झाल्याचे दिसत असले तरी नेमके मृत्युचे कारण हे शवविच्छेदनानंतरच माहिती होणार आहे.
-कामडी साहेब
वनपरिक्षेत्र अधिकारी सावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here