सासरा व साळ्याने केली दारुड्या जावयाची हत्या

0
174

माजरी (चंद्रपूर) : माजरी च्या एकतानगर मध्ये सासऱ्याने व साळ्याने मिळून जावई च्या डोक्यावर कुऱ्हाडीने व लोखंडी रॉडने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी सांयकाळी साडेसातच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील माजरी येथे घडली. आरोपी  बाप लेकानी स्वतः  पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. गेल्या आठ दिवसा पूर्वी माजरीत अतिक्रमण जागे साठी वाद होऊन एका युवकाची धार दार शस्त्रनी वार करून हत्या झाली . आता पुन्हा या घटनेने माजरीत खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार संदीप हरिदास साबळे (वय ३०) रा.एकता नगर शिवमंदिर रोड माजरी कॉलरी याने काही वर्षापूर्वी येथील रहिवाशी अमृतलाल केवट यांची लहान मूलगी ज्योती हिचे सोबत प्रेमविवाह केला. दरम्यान संदीपला एक मुलगा व एक मूलगी असून एक वर्षापूर्वी त्याचा मुलगा ज्योती माहेरीअसताना नाल्यात बुडून मरण पावला. तेव्हा पासून त्यांचे आपसात झगड़े सुरु झाले. संदीप हा पत्नीला मारहाण करत असल्याने ज्योती आपल्या मुलीला घेवून माहेरी राहत होती. संदीप हा नेहमी दारू पिवून सासरवाडीत जावून पत्नी व सासऱ्या सोबत झगड़ा-भांडण नेहमी करत  असायचा, एक महिन्यापूर्वी पती-पत्नी मध्ये भांडण झाले . दरम्यान रविवारी (दि.२७) रोजी सांयकाळी साडेसातच्या दरम्यान संदीपची पत्नी ही रेलवे कॉलोनीत घरगुती (मोलकरीण) काम करून ती परत येताना संदीप साबळेने तिचा हाथ पकडून घरी चाल असे म्हणून तिचेसोबत झटापटी करीत असताना त्याचा साळा विजय अमरितलाल केवट हा मध्यस्थी करून बाहिणीचा हाथ सोडविला.त्यावरून संदीपने त्याचे डोक्यावर काचेची बाटली मारली. त्या कारणावरुन त्याचा सासरा अमृतलाल याने लोखंडी रॉड व साळा विजय केवट याने लोखंडी कुऱ्हाडने संदीप साबळे याचे डोक्यावर मारून गंभीर जखमी केले.दरम्यान एकता नगरच्या रोडच्या गल्लीतुन जोरदार कल्ला ऐकू आल्याने संदीपचे काका मोक्यावर धावून गेले असता त्या गल्लीत संदीप हा रक्तभंभाळून अवस्थेत जमीनीवर पडलेला दिसला व डोक्यातुन रक्त निघत होते.सासरा अमृतलाल केवट (४८) व विजय केवट (१९) यांनी लोखंडी रोड व कुऱ्हाड ने हमला करून करून निघून घेणे होते. संदीपचे साबळे चा काका चरण साबळे यानी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिले व लोकांच्या मदतीने संदीपला उचलून वेकोलिच्या एरिया हॉस्पिटल येथे भर्ती केले. दरम्यान संदीपची प्रकृति गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता सरकारी दवाखाना चंद्रपुर येथे रेफर करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान संदीप साबळे याचा मृत्यु झाला.
माजरी पोलिसांनी आरोपी अमृतलाल केवट (४८) व विजय केवट (१९) यांच्या विरुद्ध हत्याचा गुन्हा दाखल केला आहे.
वरोरा चे उपविभागीय पोलिसअधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजरीचे ठाणेदार सदाशिव ढाकणे हे तपास करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here