शासनाचे नियम डावलून दूध प्रक्रिया केंद्र केले उभे : प्रदूषण मंडळाने परवानगी देताना लक्ष का दिले नाही ?

185

चंद्रपूर – ग्रामीण भागातील नागरिकांना स्वयंरोजगार म्हणून दूध विक्री साठी प्रोत्साहन देण्याकरिता राज्य शासन व केंद्र शासनाने मदर डेअरी प्रकल्प सुरू केला.
ग्रामीण भागातील जनतेकडून दूध संकलित करून त्यांना योग्य मूल्य मिळावे हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश होता.
दूध संकलित करून तो मुख्य प्रकल्पात जात त्या दुधावर योग्य ती प्रक्रिया करून मार्केट मध्ये उपलब्ध करून देणे हे सुरू आहे.
परंतु दूध प्रक्रिया केंद्र शासनाचे नियम पाळून उभारावा लागतो.
परंतु काही जणांनी शासनाचे नियम डावलून दूध प्रक्रिया केंद्र उभे केले.
दुग्ध प्रक्रिया केंद्र प्रदूषण विरहित क्षेत्रात असावे, स्थानिक अन्न व औषध विभागाकडून रीतसर परवानगी, स्थानिक ग्रामपंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा हा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक आहे.
मात्र चंद्रपूर शहरातील औद्योगिक क्षेत्रात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, शहरातील मोठ्या प्रमाणातील हा प्रदूषण रहित क्षेत्र असतांना या जागी हा प्रकल्प कसा उभा राहू शकतो व प्रदूषण मंडळाने याबाबत परवानगी देताना लक्ष का दिले नाही?
संबंधीत दुग्ध प्रकल्प चालकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपले हात वर करीत हे प्रकल्प मदर डेअरी प्रबंधनाद्वारे चालविण्यात येत आहे यात माझा हस्तक्षेप नाही.
परंतु या प्रदूषण रहित क्षेत्रात हा प्रकल्प म्हणजे लहान बाळाच्या जीवाशी खेळच, कारण दिवसाची सुरुवात दुधाने सुरू होते जर अश्या प्रदूषण रहित क्षेत्रातील दूध लहान मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतीलचं.
जिल्ह्यातील प्रदूषणरहीत क्षेत्रात हे प्रकल्प उभारले असतील तर त्याबाबत संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देत कारवाई करण्याची गरज आहे अशी मागणी भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी तर्फे विदर्भ सचिव संजय अनेजा यांनी केली आहे.
संबंधित प्रशासन जर याबाबत लक्ष देत नसतील तर आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती करून हे प्रकल्पच बंद पाडू असा इशारा सुद्धा संजय अनेजा यांनी दिला आहे.