सिंचनाच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहचाव्यात* *आमदार प्रतिभाताई धानोरकर : वरोरा, भद्रावती विधानसभेतील अनेक रखडलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा*

0
131

 

चंद्रपूर :

वरोरा, भद्रावती विधानसभेत मोठ्या प्रमाणात शेती करण्यात येते. अनेकदा पाऊस अवेळी पडत असल्यामुळे सिंचनाच्या सुविधे अभावी हातच पीक गमवावं लागते. त्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असते. त्यामुळे या भागातील अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी वरोरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष एहतेश्याम अली, अधीक्षक अभियंता सिंचाई विमलकोडजी , कार्यकारी अभियंता घोडमारे, म रा. जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता पाटबंधारे पठारेजी, उपविभागीय अभियंता भालाधरेजी, सहाय्यक अभियंता विवेक तामण, काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, बसंत सिग, प्रमोद मगरे यांची उपस्थिती होती.

वरोरा, भद्रावती विधानसभेत दिंडोरा बॅरेज, लभान सराड, लालपोथरा, भानुसखिंडी इ प्रकल्पाच्या चालू कामासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी या भागातील हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने कामाची गती वाढविण्याच्या सूचना आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या.

त्यासोबतच वरोरा नगर परिषद अंतर्गत पाणीपुरवठा योजना अपुरी होत असून वाढीव व मुबलक पिण्याचे पाणी मिळण्याकरिता नगर परिषद वरोरा येथील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. या योजनेमुळे वरोरा येथील पाणी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निकाली निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here