सासऱ्याच्या शेतात वीज पडून शेतकरी जावई ठार

0
338

 

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी (खुर्द) येथील शेतकऱ्याचा गोगाव येथील सासऱ्याच्या शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 29 सप्टेंबर ला सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली अरविंद मारोती तिजारे ( वय 45 ) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
गांगलवाडी जवळील तळोधी खुर्द येथील अरविंद तिजारे हे गोगाव येथील सासाऱ्याच्या शेतावर साळा नंदू बगडे याच्या सोबत गेले होते. साडे पाचच्या दरम्यान परिसरामध्ये जोरदार मेघगर्जना व वादळ वारा सुटला. शेतावर असतांनाच वीज पडली. यात अरविंद तिजारे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर नंदू बगडे हा त्याच ठिकाणी बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यानंतर नंदूने कसेबसे गाव गाठले व गावात घटनेची माहिती दिली. डोळ्यादेखत वीज पडून जावयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेने गोगाव, तळोधी येथे शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here