कोरोना उपचारातील त्रुट्या दूर करा  : खासदार बाळू धानोरकर :चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या शिस्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

249

 

चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव दिवसेनदिवस जिल्ह्यात वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या दहा हजारांच्या घरात गेली आहे. हि चिंतेची बाब आहे. मागील तीन दिवस खासदार बाळू धानोरकर यांनी कोरोनावर  उपयोजनेबाबत आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये अनेक त्रुट्या आढळून आल्या असून त्या दूर करण्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून सूचना केल्यात. हे निवेदन आज चंद्रपूर शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या शिस्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन दिले.

यावेळी उमाकांत धांडे, अश्विनी खोब्रागडे,  माजी नगरसेविका सुनीता अग्रवाल, कुणाल चहारे यांची उपस्थिती होती.

शासकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील कोविड रुग्णालयात वैद्यकीय पथक व उपकरणाची कमतरता भासत असून कोरोना ग्रस्त रुग्णाची बरीच हेळसांड होत आहे. कोविड रुग्णालय, महिला रुग्णालय, सैनिक शाळा, वनअकादमी या कोविड रुग्णाच्या केंद्रांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड यांच्या सह प्रत्यक्ष खासदार बाळू धानोरकर यांनी भेट दिली. यावेळी कर्तव्यावर उपस्थित डॉक्टर, नर्सेस व इतर सफाई कर्मचाऱ्यासोबत संवाद साधला असता बऱ्याच त्रुट्या आढळून आल्या. चंद्रपूर कोविड रुग्णालय येथे सध्यस्थितीत ३६ बेड उपलब्ध असून सर्वच बेड मल्टीपऱ्यामीटर ठेवण्याची गरज आहे. तसेच २ वैद्यकिय अधिकारी, फिजिशिअन १, अनेस्थिअ १, नर्सेस ६, बाकी वार्डमध्ये ४ नर्सेस तसेस येणाऱ्या रुग्णांना व्यवस्थित सेवा देण्यासाठी देखील ४ अटेंडन्ट या प्रमाणे ३ शिफ्ट मध्ये २४ कर्मचारी ठेवणे गरजेचे आहे.पीपीई किट घालून सतत ८ तास राहणे अशक्य असल्याने दर दोन तास ड्युटीवरील व्यक्ती बदलून व्यवस्थापन करावे. ८ तासाची १ शिप्ट याप्रमाणे ३ शिप्ट मध्ये इंचज ३ नर्सची नियुक्ती करावी. इंटरशिपच्या असी डॉक्टर कडून नेमून दिलेले काम व्यवस्थित रित्या करून घ्याव्या तसेच सुट्टीवर गेलेले वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर नसल्यास कारवाई करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्यात.