सिरम तयार करणार 10 कोटी अतिरिक्त करोना प्रतिबंध लस *

0
256

 

🟣 सीरम आणि गावी यांनी करोना प्रतिबंध करणाऱ्या लसीचे 10 कोटी अतिरिक्त डोस बनवण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात आज घोषणा केली आह  या लस निर्मिती प्रक्रियेला बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचाही वाटा असल्याने गती मिळणार असून 10 कोटी डोस बनवायला यामुळे फायदा होणार आहे.
भारतासाठी आणि आर्थिक दृष्ट्या मागास देशांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे.
सिरमने जगातील वेगवेगळया लस संशोधन करणाऱ्या संस्थांबरोबर करार केले आहेत. सध्या भारतात सिरमकडून ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. दरम्यान, सिरमने अमेरिकन बायोटेक कंपनी कोडेजेनिक्स बरोबरही लस निर्मितीचा करार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here