गांधी धार्मिक पण धर्मवेडे नाही –

136

 

ज्याप्रमाणे संविधानाचे मुखपृष्ठही न पाहिलेले लोक संविधान आणि बाबासाहेबांवर टिका करतात,त्याचप्रमाणे गांधीवरील एखादा लेख सुध्दा न वाचलेले तरुण गांधींवर गलिच्छ भाषेत टिका करतात.

गांधींवर प्रेम करणारे जसे गांधींचा जयजयकार करतात,तसेच गांधींचा कट्टर व्देष करणारेही त्यांचा उदोउदो करतात,यातच गांधींचे मोठेपण सामावले आहे.

गांधी कुणासाठीही ओपन आहे,खुले आहे,मोकळे आहे.त्यांना कोणीही वाचू शकतात.ज्याला जसे वाटते,तसे समजून घेवू शकता येतात.

गांधी आंदोलन करतात पण हिंसा करत नाही.
गांधी विरोध करतात पण व्देष करत नाही.
गांधी टिका करतात पण निंदा करत नाही.
गांधी धार्मिक आहे पण धर्मवेडे नाही.
गांधी धर्म मानतात पण धर्मांध नाही.
गांधी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नाही.
गांधी ईश्वर मानतात पण अतिरेक करत नाही.
गांधी कृश आहे पण कमजोर नाही.
गांधी शस्त्रहीन आहे पण भेकाड नाही.

शत्रूवरही प्रेम कसे करावे हे गांधी शिकवितात.म्हणून अनेक इंग्रज गांधींचे अनुयायी होते व आजही आहे.त्यामुळे गांधींचा व्देष करणाऱ्यांनी गांधी मुळातून समजून घेणे आवश्यक आहे.

प्रौढांपेक्षा तरुणांनी गांधी समजून घेणे सध्याची नितांत गरज आहे.
कारण हाती कोणतेही शस्त्र न घेता ताकदवान शत्रूलाही कसे झुकवता,वाकवता व नमवता येवू शकते हे गांधी शिकवितात.तरुणांना क्रांतीचे फार वेड असते.गांधी ते वेड पूर्ण करु शकतात.म्हणून तरुणांसाठी गांधी वाचणे फार आवश्यक आहे.

गांधी चुकू शकतात,रागावू शकतात,अहंकारही बाळगू शकतात,कारण ते माणूस होते हे आधी समजून घेतले की गांधी नीट समजू शकतात.

ब्रम्हचर्याचे प्रयोग लोकांना सांगितले तर आपली प्रतिमा डागाळू शकते हे नक्की माहित असूनही ते लोकांना जाहीरपणे सांगतात म्हणूनच ते महात्मा पदाला पोहचतात.

गांधींना मारलं पण गांधी मेले नाही.
गांधींना संपविलं पण गांधी संपले नाही.

८० वर्षाच्या निशस्त्र म्हाता-याची शस्त्रधारी लोकांना प्रचंड भीती वाटावी यातच गांधींची महानता लपलेली आहे.

परंतु या देशातील लोकांना बुध्द,गांधी,आंबेडकर आवडले नाही किंवा आवडू दिले नाही.जगाने त्यांना स्विकारले आणि ते महासत्ता बनले.आम्ही अजूनही हिंदू-मुस्लिम यांच्या पलिकडे जावू शकलो नाही.

बापू, किस मिट्टीका बना है रे तू !