अत्याचार ग्रस्त कुटुंबाला रा.काँ.च्या शाहीन हकीम यांची भेट!

0
177

 

*गोंडपिपरी:*- (तालुका प्रतिनिधी)

तालुक्यातील येनबोथला येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक शाहीन हकीम यांनी रविवार 4 ऑक्टोंबर रोजी पीडित परिवाराची भेट घेऊन सांत्वन करून हिंम्मत दिले.
येनबोथला येथे शुक्रवार 2 ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या काकानेच अतिप्रसंग करून कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शाहीन हकीम यांनी येनबोथला गाव गाठून परिवाराची प्रत्यक्षात भेट घेऊन पीडित मुलीला हिंम्मत व परिवाराचे सांत्वन केले.
दुर्घटनेच्या दिवशीच मुलीचे आजोबाचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपल्या नंतर पाहुण्यांचे खान-पान सुरू असतांना मद्यधुंद व हैवानियत अवस्थेत असलेला कमलाकर राऊत यांनी कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासले. कुटुंबातील वयोवृद्धाचे निधन झाल्याचे दुःख व चिंता असतांना स्वतःच्या चुलत काकानेच पुतणीवर बळजबरी करून अजून संकट व चिंतेच्या खाईत परिवाराला ढकलले आहे.
अंगावर शहारे आणणारी दुर्घटनेची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला निरीक्षक शाहीन हकीम यांना समजताच प्रत्यक्षात भेट दिले व मुलीला न घाबरता निर्भीडपणे पुढे येण्याचे व अशा विकृती, कुकर्म कृत्याच्या मानसिकतेला ठेचून काढण्यासाठी पीडित मुलीच्या व परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे शाहीन हकीम यांनी यावेळी सांगितले.
तसेच कौटुंबिक नात्याला व परिवारात दुःखद निधन झाले असतांना बळजबरी व अतिप्रसंग करण्यात आल्याने शाहीन हकीम यांनी तीव्र शब्दात निषेध करून हैवानियत आरोपी मोरेश्वर राऊत याला जेरबंद तर करण्यात आले त्याच्यावर कठोरातील कठोर शिक्षा करण्याची एकमुखी मागणी करून यापुढे असले घाणेरडे प्रकार खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
पीडित परिवाराची सांत्वनपर भेट घेतांना त्यावेळी सोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या पुष्पाताई अलोने, सूरज माडूरवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने, बाबू शेख, वर्षा कन्नाके, तालुक्यातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here