केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करावी : भाजपचे उद्या जिल्हाभर निषेध  आंदोलन*

0
158
केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली स्थगिती त्वरित उठवावी या मागणी साठी भाजपातर्फे 7 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्ह्याभर महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे
चंद्रपूर शहरात  उद्या सकाळी 11 वाजता गांधी चौक चंद्रपूर येथे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे , महापौर सौ राखी कंचर्लावार , उपमहापौर राहुल पावडे , भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर , जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे , मनपा गटनेते वसंत देशमुख यांच्यासह भाजपचे सर्व मनपा सदस्य सहभागी होतील. आंदोलनानंतर शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर करणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here