32 वर्षीय युवकाने गळफास लावून केलीआत्महत्या _ “कोरोना काळात आत्महत्याचे सत्र सुरुच”

0
394

 

वणी ( यवतमाळ ) :

पोलीस स्टेशन हद्दीतील लालगुडा येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रकाश वासुदेव कुळमेथे (३२) असे मृतकाचे नाव आहे.आज दि.६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजताचे दरम्यान प्रकाशने आपले राहते घराच्या आड्याला साडिच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृत्युदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.प्रकाश ने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here