घोटाळा चिमूर नगरपरिषदेचा : सभागृहा मध्ये संबधित अधिकाऱ्यावर कार्यवाहीचा घेतला ठराव

0
329

सर्वसाधारण सभेत खर्च नामंजुर

चिमूर ( चंद्रपूर ) : कोविड-१९ कोरोणा विषाणुचां प्रादुर्भाव रोखण्या करीता नगर परीषद क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी दोन स्प्रे पंप खरेदी करण्यात आले.हया झालेल्या खर्चास मंजूरी साठी ६ आक्टोबरला झालेल्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आले.तेव्हा सर्वसाधरण ३००० रुपया पर्यंत मिळणारे स्प्रे पंप तब्बल १९हजार९४८ रुपयाला तत्कालीन मुख्याधीकारी मंगेश खवले यांनी खरेदी केल्याचे नगर सेवकांच्या लक्षात आले.हा सभेपुढे मांडलेला खर्च सर्व नगर सेवकांनी नामंजुर केला.

संपूर्ण देशात २२ मार्चला टाळेबंदी घोषीत करण्यात आली.स्थानिक स्वराज्य संस्थाना कोरोणा विषाणुंचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजना करण्याचे दिशा निर्देश देण्यात आले.त्याप्रमाणे चिमूर नगर परीषदेने संपूर्ण क्षेत्रात जंतुनाशक स्प्रे पंपाने फवारणी केली.ह्या टाळेबंदीच्या काळात अनेक साहीत्यांची तत्कालीन मुख्याधीकारी मंगेश खवले यांनी खरेदी केली.६ आक्टोबंरला झालेल्या नगरसेवकांच्या सर्वसाधारण सभेत हा झालेला खर्च मंजुरी करीता ठेवण्यात आला.तेव्हा शेतकरी शेतात फवारणी करताना स्प्रे पंप २००० ते ३००० रुपयात मिळतो.मात्र चिमूर नगर परीषदेने तसाच स्प्रे पंप तब्बल १९ हजार ९४८ रुपयाला घेतल्याचे लक्षात लक्षात आले.त्यामूळे हा झालेला खर्च नामंजूर करूण प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करण्याचे सभेत एक मताने ठरविण्यात आले.अशी माहीती शिवसेनेचे नगरसेवक उमेश हिंगे यांनी दिली.असल्याची
२९ नोहेम्बर २०१९ च्या सभेत ठराव क्रमांक २३ प्रमाणे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना शासणाने ठरवुन दिलेल्या दरा प्रमाणे पगार देण्याचे बहुमताने ठरविण्यात आले होते.मात्र प्रशासकीय अधिकारी राकेश चौगुले यांनी ३०० रुपये रोजी प्रमाणे पगार देण्यात येणार असल्याचा ठरावात स्वमर्जीने बदल केल्याचा आरोप नगर सेवक संजय खाटीक यांनी केला.त्यामूळे या अधिकाऱ्यावर कार्यवाही करूण फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करावा असे सभागृहात ठरविण्यात आले. सर्वसाधारण सभेला नगराध्यक्ष गोपाल झाडे,उपाध्यक्ष तुषार शिंदे,बांधकाम सभापती अ.कदीर शेख,भारती गोडे,उषाताई हिवरकर,जयश्री निवटे,छाया कंचर्लावार, अॅड.अरूण दुधनकर,उमेश हिंगे,नितिन कटारे,व संजय खाटीक इत्यादी नगर सेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here