वाहनाच्या धडकेत “अस्वल” ठार

0
174

 

चिमूर
चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्गावर खडसंगी ते वाहांगाव दरम्यान अस्वलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे
खडसंगी बिटातील चिमूर वरोरा महामार्गावर बुधवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रस्त्यांनी जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आली असता घटनेची माहिती वन विभागाच्या कर्मचारी यांना देण्यात आली असता घटनास्थलावर वनपरिक्षेत्र अधिकारी भावीक चिवडे, खडसंगी उपक्षेत्राचे यु. बी. घुगरे,इ एस ननावरे, वनरक्षक रेखा ढोके यांनी घटना स्थळाचा पंचनामा करून अस्वलाला उत्तरीय तपासणी साठी खडसंगी येथील विश्रामगृहात आणण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवडे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली मात्र पशु वैदयकीय अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाही व रात्र झाल्यामुळे पोस्टमार्टेम उद्या सकाळी करण्यात येणार आहे मात्र अस्वलाचा मृत्यू वाहनांच्या धडकेने झाला की अन्य कारणांनी झाला याबाबत पोस्टमार्टेम नंतरच माहिती होणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असले तरी सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने विधुत करन्टने तर मृत्यू झाला नसावा अशी श्यक्यता नागरिकांकडून वर्तविण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here