चंद्रपूर : 24 तासात 151 नवीन बाधित; एका बाधिताचा मृत्यू

0
282

 

चंद्रपूर, दि. 8 ऑक्टोंबर :

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 151 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 11 हजार 623 वर गेली आहे. आतापर्यंत 8 हजार 369 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 74 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्ये, इंदिरा नगर, चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 4 ऑक्टोंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या बाधिताला कोरोनासह न्यूमोनियाचा आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 171, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 59, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर तालुक्यातील दोन, मुल तालुक्यातील 14, गोंडपिपरी तालुक्यातील पाच, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील चार, नागभीड तालुक्‍यातील 9, वरोरा तालुक्यातील 11 ,भद्रावती तालुक्यातील 14, सावली तालुक्यातील 11, सिंदेवाही तालुक्यातील 12, राजुरा तालुक्यातील एक, गडचिरोली दोन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 151 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील भिवापूर वार्ड, विवेकानंदनगर वडगाव, दादमहल वार्ड, गंज वार्ड, रयतवारी कॉलनी परिसर, दुर्गापुर, नगीना बाग,घुटकाळा वार्ड, तुकुम, अंचलेश्वर वार्ड, बाबुपेठ, दत्तनगर, सावरकर नगर, घुगुस, हनुमान मंदिर परिसर, सिस्टर कॉलनी, विठ्ठल मंदिर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्ड, विद्या नगर वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील विरुर भागातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील बावणे लेआउट परिसर, आनंदवन, आंबेडकर वार्ड, विनायक लेआउट परिसर, सुभाष वार्ड, चिनोरा, जिजामाता वार्ड, माढेळी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील गांधिनगर, मेढंकी, पिंपळगाव भोसले परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील बाजार वार्ड, पिपरबोरी, झिगुंजी वार्ड, गौतम नगर झाडे प्लॉट परिसर, श्रीराम नगर भागातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील अंतरगाव, वार्ड नंबर 8, कापसी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, रत्नापूर, काचेपार भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील नवखळा, किटाळी, आकापुर, पार्डी, परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड, ठक्कर वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील चिरोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here