रस्त्याच्या कडेला व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने दोघांला चिरडले

0
343

 

ब्रम्हपुरी : खटकाडा

नेहमी प्रमाणे व्यायाम करण्या करता दोघे मित्र गेले असता काळाने घात केला  ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा येथील व्यायाम करण्याकरिता गेलेल्या दोन युवकांना पहाटे साडेचारच्या दरम्यान विद्यानगर रुई जवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 9 ऑक्टोंबर ला घडली. खरकाडा येथील प्रशांत मुरलीधर सहारे (वय 18) व रोहित अशोक चट्टे ( वय 18) असे मृतकांचे नावे आहेत.
रोजच्याप्रमाणे प्रशांत व रोहित हे खरकाडा वरून आपल्या मित्रांसोबत मॉर्निंग वाक करिता खरकाडा ते आरमोरी मार्गावर जात होते 9 ऑक्टोंबर च्या पहाटे विद्यानगर रुई जवळील राईस मिल जवळ रस्त्याच्या कडेला प्रशांत व रोहित हे व्यायाम करीत असताना अज्ञात वाहनाने दोघांनाही चिरडले काही मित्र समोर गेले होते प्रशांत, रोहित हे एकत्र राहायचे प्रशांत व रोहितच्या अपघाताने खरकाडा गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी चे ठाणेदार खाडे, एपीआय बन्सोड व बीट जमादार गेडाम घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात नेले. अज्ञात वाहनाचा शोध लावण्याची मागणी या वेळी उपस्थितांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here