हाथरस घटनेच्या निषेधार्थ सामाजिक व राजकीय संघटनांचे जन आक्रोश मोर्चाचे धरणे आंदोलन

192

 

चंद्रपूर –

चंद्रपुरातील सर्व सामाजिक व राजकीय संघटनां चंद्रपूर यांनी चंद्रपूर जन आक्रोश मोर्चाचे मंचावर एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे हाथरस येथील घटनेच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सर्व संघटनेच्या वतीने मा राष्ट्रपती, मा प्रधानमंत्री, मा गृह मंत्री भारत सरकार यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन सदर प्रकरणाची सुप्रीम कोर्टाचे न्यायधीश यांचे कडून तपास करावा, प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून आरोपीने फाशीची शिक्षा देण्यात यावी,मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी केली जावी, नैतिकतेच्या आधारावर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, आरोपीचा बचाव करणाऱ्या प्रशासकीय व पोलीस अधिकारी यांची चौकशी करू शिक्षा देण्यात यावा , अश्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
सदर आंदोलनात कार्यकर्माच्या अध्यक्षा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या डॉ अभिलाषा गावतुरे,सेल्फ रिस्पेक्ट मुमेंटचे बळीराज धोटे राजकुमार जवादे संविधान संवर्धन समितीचे खुशाल तेलंग, फिरोज पठाण, अंकुश वाघमारे, डॉ राकेश गावतुरे, डॉ विवेक बांबोळे भारतीय बौद्ध महासभेचे नेताजी भरणे, ऍड जगदीश खोब्रागडे, सपना कुंभारे, सुजाता लाटकर, भीम आर्मीचे सुरेंद्र रायपूर, संघर्ष ठमके ब्रिजेश तामगाडगे प्रशांत रामटेके ऑल इंडिया समता सैनिक दलचे प्रणित भगत, प्रावीण्य पथार्डे विवेक बोरीकर , बी पी मुन, राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अकबर शेख सत्यशोधक समाजाचे प्रा माधव गुरनुले ऍड प्रशांत सोनुले, भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ सिराज खान अखिल भारतीय माळी महासंघाचे डॉ सचिन भेदे छाया ताई सोनुले संगीता पेटकुले सुनंदा निकोडे डॉ आंबेडकर लोयर्स असोसिएशन चे ऍड पुनमचंद वाकडे मराठा सेवा संघाचे प्रा अनिल डहाके वनिता ताई असुटकर सम्यक विध्यार्थी आघाडी चे धीरज तेलंग ओबीसी जनगणना समितीचे डॉ ताटेवारअविनाश आंबेकर वाल्मिकी समाज संघटनेचे राकेश खोटे वंचित बहुजन आघाडीचे सुभाष थोरात बंडू लोहट संदिप देव सिद्धार्थ शंभरकर रिपब्लिकन पक्ष चे मुन्ना भाऊ खोब्रागडे भटक्या विमुक्त जाती संघटनांचे आनंद अंगलवार रिपब्लिक स्टुडंट फेडरेशन चे राजस खोब्रागडे एम आय एम चे आयेशा खान सोहेल शेख , तसेच धानोजे कुणबी समाज संघटना,अखिल भारतीय गोंडवाना गोंड महासभा , हजरत टिपू सुलतान फांऊंडेशन,बिरसा क्रांती दल, बी एस पी , बी आर एस पी व समविचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रास्ताविक सुरेश नारनवरे संचालन जयंत डोहाने यांनी केले.