महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा (MPSC) ची पूर्व परीक्षा अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे : मुख्यमंत्री ठाकरेंनी केली घोषणा

0
189

 

अनेक दिवसांपासून विध्यार्थी आतुरतेने वाट पाहत असलेली , येत्या रविवारी 11 ऑक्टोबर रोजी होणारी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा (MPSC) ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरेंनी केली आहे.

काय आहे कारण ?

मराठा आरक्षणावर निर्णय होत नाही तोपर्यंत एमपीएससी परीक्षा घेतली जाऊ नये, अशी मागणी विविध संघटना आणि नेत्यांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर टाकल्याचे बोलले जात आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची अनेक विद्यार्थी संघटनांसह मराठा क्रांती मोर्चानेही मागणी केली होती. तसेच परीक्षा रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार संभाजी राजे यांनी दिला होता. दरम्यान, यापूर्वीदेखील ही परीक्षा कोरोनामुळे वारंवार पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता हि परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेल्याने परीक्षार्थींचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here