आ. धोटेंच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध विभागाची आढावा बैठक संपन्न

0
154

 

गोंडपिपरी (चंद्रपूर)

गेल्या तीन ते चार वर्षापासून तालुक्यातील जनसामान्यांची अनेक कामे अडगळीत पडली असून सामान्य नागरिकांच्या या संदर्भात वेळोवेळी अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. तरी शासन प्रणाली तील महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या अधिकारी वर्गांनी सर्वसामान्य जनतेची कामे तातडीने आटपावी असे निर्देश राजुरा विधानसभा क्षेत्र आ. सुभाष धोटे यांनी गोंडपिंपरी येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकी दरम्यान दिले.
आयोजित आढावा बैठकीस गोंडपिपरी येथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार के .डी .मेश्राम, गटविकास अधिकारी शेषराव बुरकुंडे , प्रभारी गटशिक्षणाधिकारी आवारी, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पटले, नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी, तालुका क्रीडा अधिकारी वडते, ठीकरे, गोंडपिपरी काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे राजीव सिंह चंदेल, कृउबा उपसभापती अशोक रेशचकर, देविदास सातपुते, नामदेव सांगळे, श्रीनिवास कंदनूरीवार, विनोद नागापुरे ,बालाजी च न कापुरे, अनिल झाडे, वासू नगारे, शैलेश बैस, संतोष बंडावर, स्वीय सहाय्यक हेमंत झाडे, पत्रकार वेदांत मेहरकुळे, तथा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आयोजित आढावा बैठकीत तालुका क्रीडा संकुल ला बाबत उद्भवलेल्या विविध समस्या यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. तालुक्यात क्रीडाप्रेमी असलेल्या तरुणांना आवश्यक क्रीडा साहित्य तसेच मैदान उपलब्ध करून देण्याबाबत क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांनी क्रीडा विभाग प्रतिनिधींना तात्काळ निर्देश दिले. तसेच क्रीडा संकुल परिसरात विविध विकास कामे करून युवकांना क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासनही आ. धोटे यांनी दिले. यानंतर तालुका क्रीडा संकुलाला प्रत्यक्ष भेट देऊन आ. धोटे यांनी क्रीडा संकुलाची पाहणी करून उपस्थित युवा वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच गोंडपिपरी येथील क्रीडा संकुलाचा कायापलट होणार असून क्रीडा संकुलाच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थितांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here