अवैध रेती तस्करीला महसूल विभागाची मूकसंमती ? शहरासह ग्रामीण भागात तस्करी जोमात

0
113

 

चंद्रपूर (गोंडपिपरी)

रेती घाटांचे लिलाव झाले नाही.असे असतांना गोंडपिपरी शहरासह,ग्रामीण भागात अवैध रेती तस्करी जोमात सुरु आहे.यामुळे रेती तस्करीला महसूल विभागाची मूकसंमती तर नाही ना ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.एकिकडे तालुक्यात शासकीय,निमशासकीय बांधकामे जोमात सुरू असतांना मात्र घरकुल लाभार्थ्यांची कामे रेतीअभावी रखडली आहेत.परिणामी लाभार्त्यांची ओरड मात्र कायम आहे.तस्कर बिनधास्त उत्खनन करुण संधीचे सोने साधत आहेत.महसूल विभागाकडून मात्र ठोसपणे कारवाई करतांना दिसत नाही.तालुक्यात असे चित्र असतांना आठवडाभरापुर्वी गोंडपिपरीत नवे तहसिलदार रुजू झाले.त्यांच्यापुढे अवैध रेतीतस्करीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पर्यावरण विभागाने घेतलेल्या भूमिकेमुळे शासन स्तरावरून रेतीघाटांचे लिलाव प्रक्रिया रखडली आहे.याचा थेट परिणाम विविध विकास कामांवर होतांना दिसून येत आहे.यातच तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत.असे असतांना गोंडपिपरी शहरासह ग्रामीण भागात छुप्या मार्गाने दिवस,रात्र तस्करांकडून रेतीचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा व्यापार सुरू आहे.मात्र येथील महसूल विभागाने आंधळ्याची भूमिका घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.इकडे घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने बांधकामे रखडली आहेत.दुसरीकडे मात्र गोंडपिपरी शहरासह ग्रामिण भागात शासकीय,निमशासकीय विकास कामासाठी रेती सहजपणे उपलब्ध होत आहे.यामुळे खरे तस्करांचे रखवाले कोण ? हा सवाल आता समोर येत आहे.महसुल विभागाच्या आशीर्वादानेच रेती तस्करांच्या टोळ्या सक्रीय होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.शहरासह ग्रामीण भागात सर्रासपणे रेती घाटांचे उत्खनन करून रेती तस्करी होत असतांना या बाबीकडे स्थानिक महसूल विभागाने कानाडोळा करित आहे.यामुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून तालुक्यातील बांधकामावर पडलेली रेतीची चौकशी करून अवैध रेती तस्करांवर लगाम घालावा,यासह विभागातील कर्तव्यशुन्य कर्मचाऱ्यांनाही वळनीवर आणावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
—————————————-
बाॕक्स :-

१)
नव्या तहसिलदारापुढे रेतीतस्करिचे आव्हान ;

आठवडाभारापुर्वी गोंडपिपरी तहसिलला के.डि.मेश्राम नामक नवे तहसिलदार रुजू झाले.तेलंगणासिमेवरिल,आदिवासीबहूल,उद्योगविरहीत या दुर्गम तालुक्यात अवैध रेतीतस्करानी रान पेटवले आहे.यामुळे या नव्या तहसिलदारापुढे रेतीतस्करीवर आळा घालण्याचे आव्हान कायम आहे.

सोईसाठी घाटांची निर्मिती :-

गोंडपिपरी तालुक्यातील तस्करांनी आपल्या सोईसाठी अवैध घाटांची निर्मिती केली आहे.असे करत ते महसुल विभागाच्या डोळ्यांत धूळ झोकून संधीचे सोने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here