स्वच्छ व सुंदर शहर केवळ कागदावरच, नगरसेवक अमोल आसेकर यांचा आंदोलनाचा इशारा

0
137

कोरपना
स्वच्छ व सुंदर शहर राहण्याकरिता १४ वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनाच्या कामावर लाखो रुपयांची तरतूद केली जाते परन्तु सदर काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने शासनाचा मुख्य उद्देशच सफल होताना दिसत नसल्याने कोरपना शहर स्वच्छ व सुंदर केवळ कागदावरच दिसत आहे,
कोरपना ग्राम पंचायतीचे रूपांतर नगर पंचायत मध्ये झाल्यानंतर शहराच्या विकासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो, अशातच शहर स्वच्छ व सुंदर राहण्याकरिता १४ वित्त आयोगाच्या निधीतून घनकचरा व्यवस्थापन कामाला दर वर्षी मंजुरी दिली जाते, या मध्ये सार्वजनिक ठिकाणची स्वछता,नाली उपसा, ओला व सुखा कचरा गोळा करून व्यवस्थापन करणे, व शहरातील स्वछता करणे आदी कामे अंदाजपत्रकानुसार करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली जाते, परन्तु संबंधित ठेकेदार व नगर पंचायत प्रशासन यांच्यात संगनमत असल्याने सदर काम अंदाजपत्रकानुसार होत नाही, केवळ थातूर- मातूर काम करून महिन्याला लाखो रुपयांची देयके उचल केली जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा निधी व्यर्थ जात आहे, सध्या कोरोना या विषाणूने थैमान घातले असल्याने अशात डेंगू, मलेरिया या आजाराने डोके वर काठू नये या करीत शहरातील स्वच्छता असणे गरजेचे आहे परन्तु या कडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष दिसत असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसत आहे,कित्येक दिवसापासून अनेक वार्डातील नाली सफाई झाली नसल्याने नालीत घाण साचलेली आहे त्यामुळे भविष्यात डेंगू, मलेरिया या सारख्या आजाराची शक्यता नाकारता येत नाही,
नगर पंचायत झाल्यानंतर एकच ठेकेदाराकडे घनकचरा व्यवस्थापनाचे काम असून मोठा गैरवहार होत आहे, परंतु याबाबत अनेकदा लेखी तक्रार होऊन सुद्धा या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, सदर कामात लावण्यात आलेल्या कामगारांना सुद्धा किमान वेतना पेक्षा कमी वेतन देऊन त्यांचे शोषण केल्या जात आहे, या सर्व प्रकारामुळे शहरातील नाली उपसा, कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे, परन्तु या कडे नगर पंचायातचे दुर्लक्ष होत असल्याने संबंधित ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे,यामुळे कोरपणा वाशीयांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे,
अनेकदा या संदर्भात लेखी तक्रार देऊन सुद्धा नगर प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने संबंधित ठेकेदाराकडून अंदाजपत्रकानुसार काम केले जात नाही. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया जात आहे, हा प्रकार अशाच सुरू राहील तर नगर पंचायतच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार,
अमोल आसेकर नगरसेवक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here