फसवणूक : १५ लाख रुपये कर्ज तेही 35 टक्के अनुदानित चे आमिष दाखवत युवकाची केली एक लाखाची फसवणूक

0
253

मारेगाव ( यवतमाळ ) : 

राष्ट्रीयकृत बँकेचे लोन काढून देतो म्हणून मारेगाव येथील युवकास एक लाखाचे वर फसवणूक केल्याची घटना घडली असून या घटनेसंदर्भात सदर युवकाने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तन्वीर रजा शेख मुबारक वय २१ अशी फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान पदवी द्वितीय वर्षालला शिक्षण घेत आहेत. त्याने दिलेल्या तक्रारीवरून तन्वीर याला ता.३० सप्टेंबरला एक लोन टॅब म्हणून टेक्स्ट मेसेज आला. त्यात प्रधानमंत्री रोजगार योजना अंतर्गत १५ लाखापर्यंत लोन मिळू शकतात.

यालाही लोणची आवश्यकता असल्याने तात्काळ त्या संदेशाला प्रतिसाद देत ९६२७२८५६६६ या नंबरवर फोन केला. तिकडून माहिती देत ४ टक्के व्याजदर व ३५ टक्के सवलत अशी माहिती दिली. कर्ज पाहिजे असल्यास आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि बँक डीटेल्स अशी माहिती मागवली. लोन मिळेल या आशेने या व्यक्तीने लगेचच सगळी माहिती पाठवली.

यानंतर ता.३ला सी. ए. ची तपासणी फी म्हणून दोन हजार सहाशे पन्नास रुपये नदीम नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर सिंडिकेट बँकेमध्ये टाकायला सांगितले. पैसे जमा झाल्याबरोबर लगेचच फोन आला व बँक ऑफ बडोदा येथून चार लाखाचे लोन मंजूर झाले आहे असे सांगितले. त्यानंतर इन्शुरन्स व साई फायनान्सची लोन प्रोसेस ही रक्कम तुम्हाला लवकर भरावी लागेल असे सांगितले. त्यामुळे लोन लवकर मिळेल या आशेने तन्वीर ने एक लाख एकशे पहासष्ठ रुपये भरले.

पैसे भरल्यानंतर लगेच फोन आला व त्यांनी सांगितले की एक तासाच्या आत तुमच्या खात्यावर 4 लाख रुपये जमा होईल. ता.८ ला सदर रक्कम जमा न झाल्याने ता.९ ला पुन्हा फोन केला तेव्हा आमच्या लोन अधिकारी यांना कोरोना झालेला आहे त्यामुळे त्यांचा मोबाईल बंद आहे. तुम्ही पंधरा दिवसानंतर फोन करा असे सांगितले. यावरून फसगत झाली आहे असे लक्षात येताच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here