मारहाण : गांजा विक्रेत्याची – आई व मुलीस अमानुष मारहाण

223

 

घुग्घूस ( चंद्रपूर )

आज देशभरात महिलांवर अत्याचाराच्या घटना होत आहे. दिवसाढवळ्या लैंगिक अत्याचार करुन हत्या, बलात्कार, मारहाणीच्या अश्या घटनेत वाढ होत आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

येथील नाजमा बेगम सिद्दीकी हि सकाळी ७ वाजात घरासमोर कपडे धुत असतांना गांजा विक्रेता नौशाद कुरेशी रा. बँक ऑफ इंडिया मागे भंगार मोहल्ला याने शुल्लक कारनावरुन भांडण करुन मारहाण करीत महिलेचा गळा दाबला व महिलेच्या अल्पवयीन मुलीस ही झापड मारली व कपडे धुण्याच्या भांड्याची तोडफोड केली.

घुग्घुस पोलिस स्टेशन गाठुन महिलेने तक्रार दाखल केली. घुग्घुस पोलीसांनी मात्र अदखपात्र ३२३,५०४,५०६ गुन्ह्याची नोंद केली आहे.

आरोपीवर कलम ३५४ चा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता

घुग्घुस येथे नौशाद कुरेशी हा मागील अनेक वर्षापासून गांजा विक्री करतो. नौशाद कुरेशी वर कोळसा तस्करी व भंगार चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहे.