भाजपाचे आघाडी सरकार विरोधात आक्रोश आंदोलन

0
171

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने याआज (१२ ऑक्टोबर)ला महाविकास आघाडी सरकार विरोधात आक्रोश आंदोलन जटपूरा गेट येथे स.10.00 वा. ते दू 12.00 वा. दरम्यान केले जाणार आहे. मातृशक्तीने यात मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे करण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिका, वरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र मुख्यमंत्री-गृहमंत्री या अत्याचाराची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच या असंवेदनशील सरकारच्या विरोधात आज 12 ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जात असताना चंद्रपूर महानगरातही आंदोलन केले जाणार आहे. आज १२ ऑक्टोबर रोजी होणा-या आंदोलनात भाजपा  जिल्हाध्यक्ष(श) डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा महिला मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्षा सौ. वनिता कानडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, जिल्‍हा परिषदेच्‍या उपाध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य राजेंद्र गांधी, खुशाल बोंडे, विजय राऊत, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, भाजपा नेते प्रकाश धारणे, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते सुरेश तालेवार, यांच्यासह भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व भाजपा महिला आघाडी (महानगर) चे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आक्रोश आंदोलनाच्या महानगर संयोजिका महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here