नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा : गोंडवाना गणतंत्र पार्टी

0
91

 

राजूरा ( प्रति )तालूक्यातील जोगापूर जंगल परिसरातील गांवात नरभक्ष्यी बाघाने धूमाकूळ घातला असून गेल्या २-३ वर्षात दहा लोकांचे बळी घेतले आहे.

10 जणांचा बळी घेणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे आज समर्थन व सहभाग आंदोलन

वाघाच्या हल्ल्यात जे लोक मारल्या गेले त्यात अनुसूचित जमाती म्हणजे अनुसूचित जमाती च्या लोकांची संख्या जास्त आहे. जे वाघाच्या तावडीतून सुटून जखमी झाले ते आमचेच लोक आहे.

येवढे होऊनही वनविभाग या नरभक्ष्यी वाघाला पकडण्यात किंवा त्याला मारण्यात कुचराई करीत असल्याने जंगल परिसरातील लोक दहशतित जीवन जगत आहे.

या परिसरातील शेतकरी- शेतमजूर यांच्या वतीने आज १२ ऑक्टोबरला दुपारी १२ वा राजूरा वनविभाग कार्यालया समोर चक्का जाम आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनाला गोंडवाना गणतंत्र पार्टी समर्थन देत असून, आंदोलनात सहभागी होत आहे.
तरी या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचे आव्हान गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here