जमीन खरेदी घोटाळा : बनावट दस्तावेज तयार करून केली जमिनिची खरेदी।  मो. हारुण सिद्दिकी यांचा प्रताप

0
312

बनावट दस्तावेज तयार करून केली जमिनिची खरेदी

रविकुमार बंड़ीवार | नांदाफाटा

कोरपना तालुक्यातील नांदा फाटा येथील कांग्रेसचे युवा नेते मो. हारुण सिद्दिकी यांनी बनावट ७/१२ तयार करून शेतजमिनीची खरेदी केली आहे. मोजा. नांदा फाटा येथील सर्वै न. ३४ पैकी ०.६१ शेतजमीन त्याने मदन बेसुराम चौधरी यांच्या कडुन रजिस्टर विकीपत्र करत करत खरेदी केली. यावेळी त्यांनी विक्रीसोबत कोरपना तालुक्यातील जेवरा येथील सर्वै न. १९/२ शेतजमिनीचा ७/१२ जोडला आहे. यात सदर ७/१२ स्वत:चा असल्याचा दस्तावेज तयार केले मात्र वास्तविक परीस्थिती बघीतली असता जेवरा येथील शेत. सर्वे नं १९ मध्ये कसलाही प्रकारची बटे पडलाचे दिसुन येत नाही व ती आजही जमीन नामदेव भोयर व सुधाकर भोयर यांचेच नावे रेकॉर्ड वरून असल्याचे दिसते. याबाबत म.न.चे प्रकाश बोरकर यांनी तहसिलदार कोरपना यांचेकडे रीतसर तक्रार फेब्रुवारी २०१९ मध्ये दाखल केली. त्याआधी पवन यादव यांनीही तक्रार मो. हारुण सिद्दिकी यांचे विरोधात दाखल केले होती. त्यानंतर तहसीलदार कोरपना यांनी तलाठी साजा कोरपना व भोयगाव यानां ७/१२ पळताळणी बाबत अहवाल मागीतला त्यावर तलाठी भोयेगाव व कोरपना यांनी ३ जानेवारी २०१९ रोजी सदर ७/१२ बनावट असल्याचा अहवाल तहसिलदार कोरपना यानां दिला आहे. मात्र तब्बल २० महिने उलटूनही बनावट ७/१२ जोडणार्‍या मो. हारुण सिद्दिकी यांचेवर कुठल्याही कारवाई करण्यात आलेली नाही.
राजकीय दबावापोटी तहसिलदार कोरपना या प्रकरणाकडे जानीवपुर्वक लक्ष देत नसल्याची शंका आता केली जात आहे. सदर प्रकरण अंत्यत गंभीर असून शासनाची फसवणूक झाली आहे. अशीच बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमिनीची खरेदी करनारे मोठे रॅकेट या प्रकरणातुन बाहेर येण्याची शक्यता आहे. तेव्हा तहसीलदार गप्प का? असाही प्रश्न आता करण्यात येत आहे. तहसीलदार यांनी मो. हारुण सिद्दिकी यांचेवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल न केल्यास मा. तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
याबाबत प्रशासनकडून दिरंगाई केली जात असल्याचे प्रकाश बोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, महसूलमंत्री तथा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांचे कडे १२ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली आहे. येत्या आठ दिवसांत बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी खरेदी करण्याऱ्या मो. हारुण सिद्दिकी यांचेवर कुठल्याही कारवाई न झालास येत्या आठ दिवसांत तहसीलदार कोरपना यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा म. न. से नेते प्रकाश बोरकर यांनी दिला आहे. आता प्रशासन काय कार्यवाही करेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

बनावट सातबारा

प्रकरणात बाबद दोन वर्षापुर्वी बोरकरने तहसिलदार कोरपना यांचेकडे तक्रार केली होती प्रकरण निकाली निघाले आहे सदर सातबारा पवनदिप यादव याने काढले होते त्याचे जमीनीचे विक्रीकरीता बनविला होता. त्यांनी सातबारा कुठुन आणला कसा बनविला हे यादवला विचारावे याचेशी माझा काहिही संमध नाही. मला त्यांनी सही कराला सांगितले तेव्हा मी सही केली मला त्याबद्दल काही माहीत नाही. प्रकाश बोरकर यांनी जे आरोप माझ्यावर केलेले आहे आरोप खोटे आहे. – मो. हारुण सिद्दिकी

 

मला याचे शेत खरेदी बद्दल काहीही माहीत नाही. मी स्वतः मागच्या वर्षी बनावट ८/१२ पळताळणी बाबत यांचे विरोधात तहसीलदार यांचे कडे तक्रार दाखल केली होती – पवनदीप यादव

बनावट ७/१२ पळताळणी बाबत अहवाल दोनही तलाठयांनी दिला आहे त्याचे अहवालात अशे निर्देशनात आले आहे की हि ८/१२ बनावट आहे. अशा लोकांना वर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आहे – प्रकाश बोरकर म. न. से चे उपजिल्हा सचिव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here