आवळगाव : वाघाच्या हल्ल्यात इसम ठार , परिसरातील नागरिकां मध्ये धास्ती

223

ब्रम्हपुरी : दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या आवळगाव बीटा अंतर्गत येणाऱ्या जंगलात हळदा येथील उमाजी कुसन म्हस्के (वय 66) हे ठार झाल्याची घटना दिनांक 15 ऑक्टोबरला सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार उमाजी कुसन मस्के हे आपल्या मशी व इतर जनावरे दिनांक 14 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता आवळगाव बिटात कक्ष क्रमांक 1142 जंगलामध्ये मध्ये चारण्यासाठी गेले होते सायंकाळी जनावरे घरी परतली पण उमाजी घरी परतला नाही याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली व जंगलात रात्री उमाजीचा शोध आवळगाव बिटाचे क्षेत्र सहाय्यक करंडे ,वनरक्षक वडडे, पेंदोर, मसराम, चक्रे, वनमजुर मधुकर सहारे, नारायण टेकाम , कोल्हे किशोर पाल, योगा नरुले यांनी नऊ वाजेपर्यंत शोध घेतला पण उमाजीचा शोध लागला नाही पुन्हा सकाळी सात वाजता शोधमोहीम सुरू केली असता जंगलामध्ये उमाजी मृतावस्थेत आढळून आला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बन्सोड, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख, शहारे, कांबळे करीत आहेत.