चिमुरात विहिरीत पडून युवकाचा मृत्यू

0
208

 

चिमूर तालुका प्रतिनिधी

चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक १३ गुरुदेव वार्ड येथील हरणे यांच्या घरच्या विहिरीत पडून रवींद्र हेमराज निनावे वय ३५ वर्ष या युवकाचा मृत्यू झाला असून ही घटना आज दि १६ ऑक्टोबरला सकाळी ९ वाच्या सुमारास घडली असून तो रंगरंगोटी करीत असताना तोल जाऊन विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला .

रवींद्र निनावे चिमूर जवळच्या शेंडेगाव -सोनेगावचा असून चिमूर येथील हरणे यांच्या घरी आपल्या कुटूंबा सह किरायाने राहत होता. तो मजुरी काम करीत होता. आज दि १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वा सुमारास नवरात्र निमित्ताने भवानी मातेचे मंदीरची रंगरंगोटी करण्यासाठी मंदिराच्या भिंतीवर चढला असता काम करताना तेव्हा त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडला .आरडाओरड करण्यात आली परंतु मदतकार्य पोहचण्यापूर्वी त्याचा विहिरीत मृत्यू झाला .ही माहिती पोलीसना दिली पोलीस आल्यावर शव विहिरीतुन बाहेर काढुन शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पीएसआय अलीम शेख तपास करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here