चंद्रपूर दीक्षाभूमी हि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण

196

चंद्रपूर : चंद्रपूर दीक्षाभूमी हि एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपुर येथे धम्मदीक्षा दिल्यानंतर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपुर येथेही धम्मदीक्षा सोहळा घडवून आणला, चंद्रपूरची भूमी हि ऐतिहासिक असून लोकांनी हा वारसा पुढे नेण्याची गरजअसल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या शुभेच्या देतांना व माल्यार्पण प्रसंगी केले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनु जाती विभाग अश्विनी खोब्रागडे, अनुसूचित जिल्हाध्यक्ष पवन अगधारी, अनुसूचित शहर अध्यक्ष कुणाल रामटेके, अनुसूचित शहर अध्यक्ष अनुश्री दहेगावकर, अनुसूचित प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, प्रवीण पडवेकर, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रय, अल्पसंख्याक प्रदेश सचिव ऍड. मलक शकीर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, गोपाळ अमृतकर, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, प्रसन्न शिरवार, राजेश अडूर, एन. एस. यू. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, महाराष्ट्र प्रदेश सचिव महोम्मद कदर, एन. एस. यू. आय जिल्हा अध्यक्ष यश दत्तात्रय, रुचिता दवे, सुरेश दूरर्सेलवार, कृष्णा नंदुरकर, तुषार लहामगे, धर्मेंद्र तिवारी, केतन दूरर्सेलवार,
गोपी मंत्री, सोनू डोंगरे, राजेश आमटे यांची उपस्थिती होती.
सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या प्रादुर्भाव आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दरवर्षी या क्रांती भूमीवर होणार सोहळा पार पडला