मोहम्मद हारून सिद्दिकी यांचेविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

0
228

 

नांदाफाटा :

काँग्रेसचे नेते सिद्दिकी यांनी बनावट सातबारा सादर करून शेत जमिन विकत घेतल्याचे समोर आले.
या प्रकरणाची सद्या परिसरात जोरदार चर्चा सुरू असताना मोहम्मद हारून सिद्दिकी यांनी सदर प्रकरणाबाबत काही आरोप पवनदिप यादव यांचेवर “माझे नांदा फाटा” ग्रुपचे माध्यमातून केले. सदर प्रकाराबाबत पवनदिप यादव यांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. याबाबत पोलिसांनी तातडीने दखल घेत मोहम्मद हारून सिद्दिकी यांचे विरोधात भारतीय दंड विधान संहितेतील तरतूदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद हारून सिद्दीकी अल्लाउद्दीन सिद्दिकी यांनी नांदा येथील भूमापन क्रमांक ३४ मधील ०.६० हेक्टर शेतजमीन खरेदी केली.श्री. मोहम्मद व हनुमान भेसुराम चौधरी यांचेकडून ही शेतजमीन घेताना सिद्दिकी यांनी कोरपना तालुक्यातील जेवरा या गावातील सर्व्हे क्रमांक १९/२ चा सातबारा स्वतः च्या नावे असल्याचे दाखवले. या खोट्या सातबारा दस्ताऐवजाच्या आधारे शेतजमिनीचे विक्रीपत्र स्वत: च्या नावे करत मदन बेसुराम चौधरी नामक शेतकऱ्याला भूमिहीन केले. सदर बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते पवन छोटेलाल यादव यांनी संपूर्ण दस्ताऐवजासह तहसीलदारांकडे तक्रार केली. सदर प्रकरणात असलेल्या जेवरा येथील वादांकित सातबारविषयी तहसीलदार कोरपना यांनी संबंधित तलाठी यांना खुलासा मागितला .

तलाठी यांनी खुलासा देताना असे सांगितले की, ” मौजा जेवरा येथील शेत सर्व्हे क्रमांक १९/२ आराजी ३.२१ हे.आर. चा सातबारा मोहम्मद हारून सिद्दीकी यांनी स्वतःच्या नावे फसवणूक करून घेतला असावा. कारण, हा सातबारा घेण्यासाठी सिद्दीकी कधीही तलाठी कार्यालयात आला नाही. हा सातबारा बनावट असल्याचे देखिल त्यांनी म्हटले. तसेच, वादांकीत सातबारातील गावाचे नाव व भोगावटदाराचे नाव या अक्षरांत तफावत असल्याची बाब निदर्शनास आली. हा सातबारा जेवरा येथील नामदेव भोयर व सुधाकर भोयर यांच्या नावाचा असल्याचे निष्पन्न झाले. ”

एकंदरीत हा गैव्यवहार उघडकीस येऊन २० महिन्यांहून अधिक कालावधी लोटला. परंतु, अद्याप सिद्दिकी यांचेवर तहसीलदार यांनी कारवाई न केल्याने आता सदर प्रकरणाची तक्रार मनसेचे नेते प्रकाश बोरकर यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे दिली. यासंदर्भातील बातमी काही वृत्तपत्रांनी प्रकाशित केल्यानंतर मोहम्मद हारून सिद्दिकी यांनी पवनदिप यादव यांचेवर पलटवार केला. सदर वादांकीत सातबारा हा यादव यांनी बनवलेला असून आपल्याला याबद्दल तहसीलदार यांचे चौकशीचे नोटीस प्राप्त झाल्यानंतर माहिती झाले असे सिद्दिकी यांनी सांगितले.

मात्र सदर खरेदी खातासोबत जेवरा येथील बनावट सातबारा जोडला असून त्या खरेदी खतावर सिद्दिकी याची सही आहे. तसेच, पवनदिप यादव यांची त्या दस्ताएेवजावर कोठेही सही नाही. तरी यादव यांची नाहक बदनामी करणारी पोस्ट मोहम्मद हारून सिद्दिकी यांनी “माझे नांदा फाटा” या व्हॉट्स ऍप ग्रुपला पोस्ट केली. सदर पोस्टचा आधार घेत मोहम्मद हारून सिद्दिकी यांचे विरोधात बदनामीकारक पोस्ट केली म्हणून भारतीय दंड विधान संहितेतील तरतुदी नुसार गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here