स्मार्ट उपसरपंचचा आदर्श वाढदिवस : वृद्धांना दिला काठीचा आधार*

0
208

 

गणेश लोंढे / नांदा फाटा
समाजाचे ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून जिल्हा स्मार्ट गाव बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांनी स्वतःचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
त्यासाठी त्यांनी गावातील ५४ वयोवृद्ध महिला व पुरुषांना वृद्धवस्थेत काठीचा आधार म्हणून काठ्या वितरित केल्या. तसेच गावातील कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १५ जणांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देत सत्कार करण्यात आला. उपसरपंच यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला व उतरत्या वयात वृद्धांच्या मनात आनंदाचा क्षण आणला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here